शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नवीन अध्यक्षांपुढे निवडणुकीचे आव्हान!

By admin | Updated: March 2, 2016 03:17 IST

२०१७ मध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी भाजपला गेल्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागणार आहे.

स्थायी समिती अध्यक्षांची शुक्रवारी निवड : बंडू राऊत स्वीकारणार पदभारनागपूर : २०१७ मध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी भाजपला गेल्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागणार आहे. यात स्थायी समितीची भूमिका महत्त्वाची असल्याने समितीचे नवीन अध्यक्ष बंडू राऊ त यांना निवडणुकीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपत आहे. त्याच दिवशी राऊ त अध्यक्षदाची सूत्रे स्वीकारणार आहे. यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. आजवर स्थायी समिती अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला जात होता. परंतु यावेळी ४ मार्चला अध्यक्षपदाची निवडणूक असून त्याच दिवशी नवीन अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ होत आहे. महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना गेल्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे शहरातील विकास कामे डिसेंबर पूर्वी करावी लागतील. यासाठी ३१ मार्चपूर्वी २०१६-१७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. या दृष्टीने पदाधिकारी व प्रशासन कामाला लागले आहे. अनधिकृत ले-आऊ टमधील विकास कामे, शहरातील रस्ते, सिव्हरलाईन, पथदिवे अशा विकास कामांसाठी नगरसेवकांचा आग्रह राहणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने गेल्या वर्षात स्थायी समितीच्या मंजुरीनंतरही अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. निधीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे निधी पळवापळवीचे प्रकार वाढणार आहेत. वजनदार नगरसेवकांच्या प्रभागातील कामे तातडीने मार्गी लागतात तर वजन नसलेल्यांना फाईल्स घेऊ न फिरावे लागणार आहे. विकास निधीसाठी चांगलीच रस्सीखेच होणार आहे. (प्रतिनिधी)