शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

'सीएम'च्या बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार 'ट्रिक' की देवेंद्र फडणवीसांची 'हॅटट्रिक'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 16:19 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. येथील एकूण राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता भाजपासाठी हा मतदारसंघ ‘सेफ’ मानण्यात येतो.

ठळक मुद्देगटबाजी टाळणार कशी ? भाजपा कार्यकर्त्यांचा मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. येथील एकूण राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता भाजपासाठी हा मतदारसंघ ‘सेफ’ मानण्यात येतो. येत्या विधानसभा निवडणुकांत भाजपाकडून मुख्यमंत्री येथून लढतील असेच अंदाज लावण्यात येत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसकडून प्रफुल्ल गुडधे यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु मतदारसंघात असलेल्या गटबाजीचा सामना करण्याचे मोठे आव्हानच कॉंग्रेससमोर राहणार आहे.२००९ साली विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाची निर्मिती झाली. पश्चिम नागपुरातील बराचसा भाग यात आला व यात प्रामुख्याने पांढरपेशा वस्ती अशी ओळख असलेल्या भागाचे प्रमाण मोठे होते. सद्यस्थितीत या मतदारसंघात भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव अंतिम मानण्यात येत आहे. इतर कुठल्याही नेत्याने तेथे उमेदवारीसाठी दावादेखील केलेला नाही. परंतु जर ऐनवेळी पक्षाने मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून निवडणूक लढावी असे ठरविले तर मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्यावर विश्वास टाकला जाऊ शकतो.कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनाच परत उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसकडून कुमार बोरकुटे, उमेश शाहू, गणेश कश्यप, डॉ.गजराज हटेवार यांनीदेखील अर्ज घेतले आहेत. आता यातील नेमके किती जण प्रत्यक्ष उमेदवारीसाठी दावा करतात हा प्रश्नच आहे. परंतु या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी हा कॉंग्रेससमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. २०१७ मधील मनपा निवडणुकांत प्रभाग ३८ मध्ये लढण्यासाठी प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी दावा केला होता. त्यामुळे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना दुसºया प्रभागातून लढावे लागले. निवडणुकीला दोन वर्ष झाली असली तरी पक्षात अंतर्गत धुसफूस कायमच आहे. त्यामुळे विधानसभेसाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एकजूट करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.याशिवाय बसपाकडूनदेखील या मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. बसपाकडून उषा बौद्ध, अशोक डोंगरे, विवेक हाडके, नवनीत धाबाडे, सदानंद जामगडे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

‘ग्रॅन्ड हॅट्ट्रिक’साठी प्रयत्नदेवेंद्र फडणवीस हे सातत्याने चार वेळा विधानसभा निवडणुकात विजयी झाले असले तरी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील ही त्यांची तिसरी निवडणूक राहणार आहे. मतदारसंघातील पहिल्याच निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी २७ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला होता तर २०१४ मधील निवडणुकांत ते ५८ हजार ९४२ मतांनी निवडून आले होते. लोकसभा निवडणुकांत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना या मतदारसंघात ५५ हजार ११६ इतके मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराच्या मतांची टक्केवारी २०१४ च्या तुलनेत आणखी वाढावी व येथे ‘ग्रॅन्ड हॅट्ट्रिक’ व्हावी यासाठी कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. संघटन पर्वाच्या माध्यमातून नवीन मतदारनोंदणीवरदेखील भर देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री स्वत: ठेवतात लक्षदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची जबाबदारी असली तरी वेळात वेळ काढून ते दक्षिण-पश्चिम नागपुरातील समस्या, येथील विकासकार्य यावर जातीने लक्ष ठेवतात. या मतदारसंघातील पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडून ते नियमितपणे आढावा घेतात. या मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाले आहे. तसेच येथील मूलभूत समस्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. लोकसभा निवडणुकानंतर मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन आढावा घेतला होता व विधानसभेसाठी कार्याची दिशा ठरवून दिली होती. दुसरीकडे कॉंग्रेसकडूनदेखील या भागात जनसंपर्कावर भर देण्यात येत आहे. मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्ते मतदारांशी संपर्क ठेवून आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019