शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

चेनस्रॅचिंगचे नेटवर्क

By admin | Updated: June 12, 2014 01:20 IST

शहरात मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या पळविणाऱ्या गुन्हेगारांचे मोठे नेटवर्क आहे. हे गुन्हेगार सहज हाती लागणे मुश्कील असून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या सासू जयश्री सुरेंद्र

द्रविड यांच्या सासूचे मंगळसूत्र पळविले : गुन्हेगार गवसतील काय ?
नागपूर : शहरात मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या पळविणाऱ्या गुन्हेगारांचे मोठे नेटवर्क आहे. हे गुन्हेगार सहज हाती लागणे मुश्कील असून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या सासू जयश्री सुरेंद्र पेंढारकर यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळवणारे लुटारू पोलिसांना गवसतील काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुभाषनगर नाईक ले-आऊटमधील जयमंगल अपार्टमेंट येथे राहणाऱ्या जयश्री पेंढारकर या मंगळवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास व्हीआरसीई कॉलेजजवळील स्टेट बँक आॅफ इंडिया येथून काम आटोपून एटीएमजवळ पार्क केलेल्या आपल्या कारमध्ये बसत असतानाच त्यांच्या मागावर असलेल्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटका मारून पळवून नेले.
या घटनेने व्हीएनआयटीच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पेंढारकर आणि प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना लुटारूंचे वर्णन सांगितले. परंतु अद्यापही आरोपी गवसलेले नाहीत.
१० ते १२ टोळ्या
कमी जोखीम आणि क्षणात भरपूर पैसा देणाऱ्या चेनस्रॅचिंगच्या गुन्ह्याकडे घरफोडी आणि चोरीचे गुन्हेगारही वळत असून चेनस्रॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचे नेटवर्क सतत वाढत आहे. ही माहिती या गुन्ह्याचा तब्बल चार वर्षे अभ्यास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
सध्या शहरात १० ते १२ टोळ्या असून टोळीतील एखादा गजाआड झाला की, त्याच्यासोबतचा लागलीच दुसरी टोळी तयार करतो. पोलिसांच्या अभिलेखावर आतापर्यंत या गुन्ह्यातील दीडशेवर गुन्हेगार आहेत.
मुस्तेफा ऊर्फ शानूखाँ जमीलखाँ पठाण हा या धंद्यातील सर्वात मोठा गुन्हेगार आहे. त्याच्या खालोखाल शानूखाँचा भाऊ मंजू, सचिन नरहरी पेशवे, लोकेश भोंडे, स्वरूप नरेश लोखंडे, निकुंज ऊर्फ निक्की रमेश साधवाणी यांचा क्रमांक लागतो. परंतु ते सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. या गुन्ह्यातील नंबर दोनचे म्होरके मोहम्मद इस्ताक ऊर्फ बाबा आणि सतीश समुद्रे हे बाहेर असून ते वेगवेगळ्या भागात गुन्हे करीत असल्याची पोलिसांना माहिती आहे. या गुन्ह्यात बी.एससी. आणि बी.बी. ए. सारखे शिक्षण घेतलेले विद्यार्थीही सक्रिय आहेत.
गतवर्षी प्रकाश पारधी आणि सुमित श्यामलाल वर्मा नावाच्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या कारागृहात आहेत. हे गुन्हेगार पोलिसांची गस्त नसलेल्या भागात टेहळणी करतात आणि आपले सावज हेरतात. सोनारांनी तुटलेल्या चेन आणि मंगळसूत्र विकत घेऊ नये, पोलिसांना त्याबाबत सूचना द्यावी, ज्या भागात असे गुन्हे अधिक प्रमाणात घडतात तेथे पोलिसांची सतत गस्त असावी, त्यामुळे चेनस्रॅचिंगच्या गुन्ह्यांवर आळा बसू शकतो, असेही या पोलीस अधिकाऱ्याचे मत आहे. (प्रतिनिधी)