शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

नागपुरातील मनीषनगरात चेन स्नॅचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 8:34 PM

मनीषनगर येथे एका महिलेची चेन स्नॅचिंग करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनीषनगर येथे एका महिलेची चेन स्नॅचिंग करण्यात आली. अनिता ज्ञानेश्वर झाडे रा. जयहिंद सोसायटी मनीषनगर या बाजारात गेल्या होत्या खरेदी करून त्या पायी घराकडे जात होत्या. दरम्यान बाईक चालक युवकाने त्यांच्या गळ्यातील २३ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. बेलतरोडी पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.उघड्या फ्लॅटमधून एक लाखाचे दागिने लंपासउघड्या फ्लॅटमधून चोरट्याने एक लाखाचे दागिने लंपास केले. २५ वर्षीय श्रेया हितेश तिवारी या मानकापुरातील रुद्राक्ष रेसिडेन्सी येथे राहतात. त्या १० ऑगस्ट रोजी सायंकाळी फ्लॅटचा दरवाजा उघडा ठेवून खाली पार्किंगमध्ये गेल्या. दरम्यान त्या परत आल्यावर त्यांना टेबलवर ठेवलेल्या पर्समधून ५०० रुपये चोरीला गेल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी त्यांनी बॅग तपासली तेव्हा त्यात ठेवलेले एक लाखाचे दागिनेही चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी मानकापूर पोलिसातच तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटकघरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. नीलेश दिलीप पोटफोडे (३०) रा. स्वागतनगर पारडी आणि फिरोज शमशाद अंसारी (२१) रा. अंबेनगर पारडी अशी आरोपीची नावे आहे. भांडेवाडी येथील रहिवासी संगीता मेश्राम यांच्या घरचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह ५० हजाराचे सामान चोरले होते. पारडी पोलिसांना तपासात आरोपींचा सहभाग असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याना अटक करून ३६ हजार रुपयाचा माल जप्त केला.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीnagpurनागपूर