शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

दाेन अपघातांमध्ये चाैघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क धामणा/पारशिवनी : नागपूर जिल्ह्यात २४ तासात झालेल्या अपघाताच्या दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये चाैघांचा मृत्यू झाला असून, दाेघे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

धामणा/पारशिवनी : नागपूर जिल्ह्यात २४ तासात झालेल्या अपघाताच्या दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये चाैघांचा मृत्यू झाला असून, दाेघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वडील व मुलासह विद्यार्थ्याचा समावेश आहे. जखमींमध्येही महिला (आई) व एक विद्यार्थी आहे. अपघाताची पहिली घटना पारशिवनी शहरात बुधवारी (दि. ६) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. यात भरधाव ट्रॅव्हल्सने माेटरसायकलला मागून धडक दिली. दुसरी घटना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा शिवारात गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली असून, यात सुसाट कार ट्रकच्या मागच्या भागावर आदळली.

डाॅ. बाबुराव श्रावण भुरे (६२), गणेश बाबुराव भुरे (२५) दाेघेही रा. पंचवटी आश्रम, दिघाेरी, नागपूर, यश भालेराव (१७) व अनुप अतुल पनवेलकर (१४) दाेघेही रा. पारशिवनी अशी मृतांची तर वंदना बाबुराव भुरे (५०, रा. पंचवटी आश्रम, दिघाेरी, नागपूर) व लकी चव्हाण (१४, रा. पारशिवनी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. भुरे कुटुंबीय एमएच-३१/डीके-४४२६ क्रमांकाच्या कारने काेंढाळी (ता. काटाेल)हून नागपूरला जात हाेते. ते धामणा शिवारात पाेहाेचताच त्यांची कार राेडवर उभ्या असलेल्या डीडी-०३/एम-९१८४ क्रमांकाच्या ट्रकवर मागून धडकली. यात वडील डाॅ. बाबूराव व मुलगा गणेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आई वंदना गंभीर जखमी झाल्या. दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून, वंदना यांना उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

तत्पूर्वी, पारशिवनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात भरधाव ट्रॅव्हल्सने माेटरसायकलला मागून धडक दिल्याने दाेघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यश भालेराव, अनुप पनवेलकर व लकी चव्हाण तिघेही एमएच-४०/बीबी-४१३७ क्रमांकाच्या माेटारसायकलने खापरखेडा (ता. सावनेर) येथून पारशिवनीला येत हाेते. ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात पाेहाेचताच मागून वेगात येणाऱ्या एमएपी-४८/पी-०२९१ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात यश व अनुपचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर लकी गंभीर जखमी झाला. अपघात हाेताच नागरिकांसह पाेलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दाेघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर लकीला उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे लकीवर प्रथमाेपचार करून त्याला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी अनुक्रमे हिंगणा व पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

....

क्रेनची मदत

धडक एवढी जबर हाेती ती कार थेट ट्रकच्या आत शिरली हाेती. धडक लागताच कारची चारही दारे ‘लाॅक’ झाली हाेती. त्यामुळे आतील जखमींना वेळीच बाहेर पडणे शक्य झाले नाही. यात समाेर बसलेले कारचालक गणेश भुरे व त्यांचे वडील डाॅ. बाबूराव भुरे यांचा मृत्यू झाला. ट्रकमध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी पाेलिसांना ‘क्रेन’ची मदत घ्यावी लागली. या अपघातामृळे महामार्गाच्या एका ‘लेन’वरील वाहतूक ठप्प झाली हाेती. कार बाजूला केल्यानंतर हिंगणा पाेलिसांनी वाहतूक सुरळीत केली. नागरिकांचा राेष लक्षात घेता पारशिवनी पाेलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेली ट्रॅव्हल्स खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा केली हाेती.