शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

नागपुरातील मध्यवर्ती सीताबर्डी भाग लहान मुलांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:57 AM

सीताबर्डी परिसराची ओळख ही शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून आहे. मात्र पोलीस विभागातील नोंदीनुसार हा परिसर लहान मुलांसाठी धोकादायक ठरतो आहे.

ठळक मुद्देसाडेतीन वर्षांत २४ मुलांचा बळीतीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ५४ ज्येष्ठ नागरिक पडले बळी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डी परिसराची ओळख ही शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून आहे. मात्र पोलीस विभागातील नोंदीनुसार हा परिसर लहान मुलांसाठी धोकादायक ठरतो आहे. २०१५ पासून साडेतीन वर्षांत सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ लहान मुलांचे विविध हल्ल्यांमध्ये बळी गेले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांकडे विचारणा केली होती. २०१५ पासून धंतोली, अंबाझरी व सीताबर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत किती गुन्हे झाले, त्यात हत्या-महिलांवरील अत्याचार तसेच लहान मुलांवरील हल्ले व बळी इत्यादींचे प्रमाण किती होते, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते.प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत लहान मुलांवरील हल्ल्याचे २४ गुन्हे दाखल झाले वयात २४ मुले किंवा मुली यांचा बळी गेला.२०१५ व २०१६ या दोन्ही वर्षात प्रत्येकी नऊ बळी गेले. तर २०१८ मधील पहिल्या सहा महिन्यांतच तीन मुलांना जीव गमवावा लागला. याच कालावधीत तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत थोडेथोडके नव्हे तर ५४ ज्येष्ठ नागरिक विविध घटनांमध्ये बळी पडले. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३४ तर अंबाझरीत १८ जणांचा जीव गेला.लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे बळी नेमके कुठल्या कारणामुळे गेले हे पोलीस विभागाने स्पष्ट केले नसले तरी ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

महिला अत्याचाराची ३९ प्रकरणेसीताबर्डी, धंतोली व अंबाझरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पांढरपेशा वस्तीचे प्रमाण मोठे आहे. मात्र असे असतानादेखील साडेतीन वर्षांत या परिसरात महिला अत्याचाराची ३९ प्रकरणे नोंदविण्यात आली. तर या कालावधीत येथे २२ हत्या झाल्या. ‘चेनस्नॅचिंग’चे प्रकारदेखील येथे दिसून आले. १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत ‘चेनस्नॅचिंग’चे ७७ गुन्हे नोंदविण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी