प्लास्टिकऐवजी सिमेंटचे बॅरिकेड्स, लोकांचे जीव घ्यायचे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:53 IST2025-06-26T15:43:50+5:302025-06-26T15:53:42+5:30

Nagpur : घोराड बायपासवर अपघातात तिघे जखमी

Cement barricades instead of plastic, do you want to take people's lives? | प्लास्टिकऐवजी सिमेंटचे बॅरिकेड्स, लोकांचे जीव घ्यायचे आहेत का?

Cement barricades instead of plastic, do you want to take people's lives?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अगदी न दिसण्यासारखा डायर्व्हेशनचा बोर्ड लावला. पुढे प्लास्टिकऐवजी सिमेंटचे बॅरिकेड्स लावले. यामुळे मंगळवारी (दि.२४) रात्री एक कार या सिमेंटच्या बॅरिकेडवर आदळून कारमधील तिघे जखमी होऊन कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना कळमेश्वरपासून २ किलोमीटर अंतरावर घोराड बायपासवर घडली.


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदाराच्या चुकीमुळे परिसरात अपघातांची मालिकाच सुरू असून, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. या प्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रा. मृण्मय मेश्राम (३४, काटोल) हे मंगळवारी (दि.२४) रात्री ८:३० वाजता कारने आपल्या दोन भावांसह काटोलवरून कळमेश्वरला जात होते. मार्गात कळमेश्वरपूर्वी २ किलोमीटर अंतरावर असलेल्या घोराड बायपासवर त्यांची कार सिमेंटच्या बॅरिकेड्सला जाऊन धडकली. सिमेंटच्या बॅरिकेड्सपूर्वी 'एनएचएआय'ने डायव्हर्शनचा एक बोर्ड लावला होता. हा बोर्ड वाहनचालकांना दिसतही नाही इतका लहान आहे. त्यानंतर पुढे काही अंतरावर प्लास्टिकऐवजी सिमेंटचे तीन बॅरिकेड्स लावले आहेत. मेश्राम यांनां डायव्हर्शनचा बोर्ड न दिल्यामुळे त्यांची कार सिमेंटच्या बॅरिकेड्सवर जाऊन आदळली. यात कारचा समोरील भाग आणि दरवाजांचे मोठे नुकसान झाले. अपघातात कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या भावंडांना किरकोळ मार लागला. परंतु हा अपघात जीवघेणा ठरू शकला असता, असे मेश्राम यांनी सांगितले. 


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व संबंधित कंत्राटदाराने सिमेंटऐवजी प्लास्टिकचे बॅरिकेड्स लावले असते तर त्यांना जखमा न होता कारचे नुकसानही झाले नसते. अपघातानंतर कळमेश्वर येथील शिंदेसेनेचे तालुका प्रमुख ब्रिजलाल रघुवंशी यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना मदत केली. या अपघाताबद्दल मेश्राम यांनी कंत्राटदाराविरुद्ध कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या अपघाताला कारणीभूत कंत्राटदार कंपनी आणि कंत्राटदाराचे नाव माहित नसल्यामुळे मेश्राम यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत कंत्राटदार असा उल्लेख केला आहे.


अनेकांचे अपघात, फॅक्चरही झाले
कळमेश्वर परिसरात अनेक ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. डायर्द्धशनवा न दिसण्यासारखा बोर्ड आणि सिमेंटचे बरिकेड्स यांमुळे या परिसरात अनेकांचा अपघात होत असून काही वाहनचालकांचे हात-पाय फ्रैक्चरही झाले आहेत, कळमेश्वरजवळ सुरू असलेल्या ओव्हरब्रिजच्या कामाच्या ठिकाणीही सिमेंटचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे 'एनएचएआय'ने वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन डायव्हर्शनचा मोठा फलक लावून सिमेंटऐवजी प्लास्टिकचे बॅरिकेड्स लावण्यत्वी मागणी होत आहे.

Web Title: Cement barricades instead of plastic, do you want to take people's lives?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.