शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

दूध पिऊन साजरे करा नवीन वर्ष

By admin | Updated: December 28, 2015 03:23 IST

तीन दिवसांवर येऊन ठेपलेले नवीन वर्ष साजरे करण्याची तयारी प्रत्येकाने सुरू केली असेल. या तयारीमध्ये ‘मद्य’ म्हणजेच दारू हा महत्त्वाचा भाग असतो.

व्यसनमुक्तीसाठी अंनिसचे आवाहननागपूर : तीन दिवसांवर येऊन ठेपलेले नवीन वर्ष साजरे करण्याची तयारी प्रत्येकाने सुरू केली असेल. या तयारीमध्ये ‘मद्य’ म्हणजेच दारू हा महत्त्वाचा भाग असतो. मात्र थांबा! दारूचा पहिला घोट तुमच्या व्यसनास कारणीभूत ठरू शकतो. यामुळे नवीन वर्ष दारू ऐवजी दूध पिऊन साजरे करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. त्यासाठी ते ३१ डिसेंबरला प्रत्येक शहरातील अंनिसच्या शाखेमध्ये दुधाचे वाटप करणार आहेत.अंनिसच्यावतीने २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान व्यसनविरोधी निर्धार सप्ताह पाळला जात आहे. याबाबत अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले की, ‘डे’ साजरे करण्याच्या चलनामुळे समाजात व्यसनाला प्रतिष्ठा मिळाली आहे. राज्याचा महसूल वाढविण्यासाठी व्यसनाला महत्त्व देण्याचे सरकारचे धोरणही दारूसारखे व्यसन वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या पाच आजारांपैकी नैराश्य हाही एक आजार आहे. हे नैराश्य व्यसनातूनच येते. यातून पुढे हिंसक वळण, मानसिक आजार व आत्महत्यासारखे प्रकार घडतात. ‘द’ दारूचा नाही तर, ‘द’ दुधाचा हा संदेश घेऊन अंनिसतर्फे नवीन वर्षाच्या स्वागतावेळी संस्थेच्या केंद्रात दुधाचे वाटप केले जाणार आहे. ३१ डिसेंबरला प्रत्येक शहरात अंनिसच्या शाखेमध्ये दूधवाटप केले जाणार असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले. याशिवाय व्यसनांचे दुष्परिणाम दाखविण्यात आलेले ‘प्रतीक्षा’ आणि ‘प्रतिज्ञा’ हे दोन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. हे दोन्ही चित्रपट यू-ट्यूबवर भारतातील सर्वच भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. महाविद्यालयांमध्ये जाऊन युवकांना व्यसनांपासून अलिप्त राहण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)महिला आणि व्यसनपुरुषांच्या कोणत्याही व्यसनाचे दुष्परिणाम हे महिलांना सर्वाधिक भोगावे लागतात. यामुळे खास महिलांसाठी अंनिसतर्फे ‘चला दारूला बदनाम करूया’ हा उपक्रम राबविला जातो. याअंतर्गत महत्त्वाच्या चौकात दारूकिंवा गुटखा, अशा व्यसनांचे प्रतिकात्मक पुतळे तयार करून महिलांद्वारे या पुतळ्याला चपलेने मारल्या जाते. अंनिसने हा उपक्रम नव्याने सुरू केला आहे.अंनिसतर्फे दुधाचे वाटपविविध ‘डे’ साजरे करण्याचे नवे चलन हे कोणत्याही व्यसनाची सुरुवात करणारे ठरते. यामध्ये तरुण-तरुणींचा समावेश अधिक असतो. नवीन वर्ष तर या मालिकेतील सर्वात महत्त्वाचा दिवस. त्यामुळे या दिवसात प्रत्येक शहरामध्ये दारूचा जणू महापूरच वाहत असतो. यातील लाखो तरुण-तरुणी एकदा म्हणून दारूच्या अनुभवाला सामोरे जातात. यात मुलींचाही समावेश असतो. मात्र हा पहिला घोट व्यसनाला कारणीभूत ठरू शकतो. एका संशोधनानुसार दारूचा पहिला घोट घेणाऱ्यांपैकी १५ टक्के लोक नंतर या व्यसनाच्या आहारी जाणारे ठरतात. दारू पिऊन नवीन वर्षाचे स्वागत उन्मादी मानसिकतेचे प्रतीक ठरते. त्यामुळे हा घोट थांबविणे आवश्यक आहे.-अविनाश पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस