शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

५ फेब्रुवारी हा आतंकवाद विराेधी दिवस म्हणून साजरा करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST

नागपूर : पाकिस्तानद्वारे ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर एकात्मता दिवस म्हणून पाळत असते. पाकिस्तानला चाेख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही हा ...

नागपूर : पाकिस्तानद्वारे ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर एकात्मता दिवस म्हणून पाळत असते. पाकिस्तानला चाेख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही हा दिवस आतंकवाद विराेधी दिवस म्हणून साजरा करावा, अशी मागणी माजी वायुसैनिक कल्याण संघटनेतर्फे (इवान) करण्यात आली. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली.

१४ फेब्रुवारी २०१९ राेजी स्फाेटके भरलेली कार सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये घुसली आणि जवानांच्या बसला धडक दिली. या भीषण हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांचा हकनाक बळी गेला. या घटनेचा निषेध व हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी इवान संघटनेच्या वतीने वर्धा राेड अजनीस्थित अमर जवान स्मारकावर कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. यावेळी निवृत्त वायुसैनिकांसह नागरिकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संघटनेचे सचिव महेश आंबाेकर म्हणाले, भारतीय जवान दहशतवाद्यांना चाेख प्रत्युत्तर देत आहेत. मात्र भारतीय म्हणून नागरिकांनी जवानांचे मनाेबल वाढविण्याची गरज आहे. अल्पवयात सैन्यात भरती हाेणारा जवान देशाच्या सीमांवर दिवस-रात्र पहारा देत असताे. त्यामुळे देशातील जनता सुरक्षित आहे व उत्सव सुरक्षित पार पाडत असते. सरकारने ५ फेब्रुवारी आतंकवादी विराेधी दिवस म्हणून निर्धारित करून दहशतवाद्यांचे खच्चीकरण करावे, अशी भावना आंबाेकर यांनी व्यक्त केली.

ब्रिगेडियर सुनील गावपांडे यांनी, पुलवामा घटनेत जवानांच्या मृत्यूचे नुकसान भरून येणारे नाही. पुढे भारतीय जवानांनी चाेख प्रत्युत्तर देऊन घटनेचा वचपा काढला. मात्र अशाप्रकारच्या घटना भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगल्या नाहीत. त्यासाठी लाेकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत हाेणे आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. इवान संघटनेचे अध्यक्ष मनाेहर भातकुलकर यांनीही भावना व्यक्त केल्या. यावेळी श्रीकांत गंगाथडे, चंद्रशेखर कुळकर्णी, प्रमाेद भुसारी, ओमप्रकाश शिरपूरकर, विवेक समर्थ, सुधाकर सार्वे, विलास दवणे, नीलेश व्यास, गाेपाल वानखडे, मधुकर भांडारकर, विनाेद कडू, केळापुरे, गलगलीकर, किशाेर हजारे, पंजाबराव भाेयर, किरपाने, पेरकर, अजय उदार, अजय गाढवे, प्रदीप देव, पुंडलिक सावंत, रामभाऊ काेरके, रमेश गायकवाड, लक्ष्मणराव साळुंखे, मनाेज कुळकर्णी, मनीष भातकुलकर, नारायण लालखेडे आदी उपस्थित हाेते.