शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सीबीएसई बारावीचा निकाल : विद्यार्थिनींच्या यशाचा ‘उंच झोका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 11:16 PM

‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमात मुलींनीच अव्वल क्रमांक पटकाविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमात मुलींनीच अव्वल क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे यंदादेखील वाणिज्य शाखेतीलच विद्यार्थिनींनी अव्वल येण्याची परंपरा कायम ठेवली. एरवी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ‘सेलिब्रेशन’ने शाळांचा ‘कॅम्पस’ दणाणून निघतो. मात्र यंदा ‘कोरोना’मुळे ‘सेलिब्रेशन’ला मर्यादा आल्या.

बारावी ‘सीबीएसई’च्या परीक्षेला शहरातून अडीच हजारांहून हजार विद्यार्थी बसले होते. १५ फेब्रुवारी ते ३० मार्च या कालावधीत परीक्षा नियोजित होत्या. मात्र ‘कोरोना’मुळे १८ मार्चपर्यंतचेच पेपर होऊ शकले. त्यानंतरच्या पेपरसाठी ‘सीबीएसई’ने यंदा वेगळी पद्धत अवलंबली. निकाल कधी लागेल यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. जवळपास ३०० विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण आहेत. यात विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त असल्याची माहिती शाळांतर्फे देण्यात आली आहे. तिन्ही शाखांमधील पहिल्या २० मध्ये विद्यार्थिनींचेच प्रमाण अधिक आहे. मानव्यशास्त्र शाखेत बी.पी.भवन्स विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर) येथील केतकी मोघे ही ९८.६ टक्के गुणांसह प्रथम आली. तर विज्ञान शाखेत सेंटर पॉर्इंट स्कूल (काटोल मार्ग) येथील विद्यार्थी अरुणव भौमिक याने ९८ टक्के गुणांसह अव्वल क्रमांक पटकाविला.अनेक शाळांचे १०० टक्के निकालसामान्यत: विज्ञान विषयात जास्त गुण मिळतात, असा समज आहे. मात्र ‘सीबीएसई’च्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी यंदादेखील उल्लेखनीय कामगिरी करून शहरातून अव्वल स्थान पटकाविले. ‘मेट्रो’ शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वाणिज्य शाखेला मागणी वाढत असून, अनेक गुणवंत विद्यार्थी इकडे वळत आहेत. येणाऱ्या काळात वाणिज्य शाखेवर विद्यार्थ्यांचा जास्त भर नक्कीच दिसून येईल, असा विश्वास अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखविला. बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले. मात्र काही शाळांमध्ये ‘टॉपर्स’चा टक्का मात्र खालावला व ९० टक्के गुण मिळविणारे कमी विद्यार्थी दिसून आले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ‘सेंटर पॉईंट स्कूल (वर्धमाननगर), बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स), बी.पी.भवन्स विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर), सेंटर पॉईंट (काटोल रोड) या शाळांमध्ये सर्वात जास्त ‘टॉपर्स’ आहेत.‘सर्व्हर’मुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप‘सीबीएसई’ने संकेतस्थळावर १२.३० नंतर निकाल जाहीर केला. मात्र ‘सर्व्हर’वर ‘लोड’ आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचण आली. शाळांना तर विशेष मेहनत घ्यावी लागली. संथ संकेतस्थळामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल पाहावा लागत होता.वाणिज्यक्रमांक नाव टक्के शाळा१ दिव्या सूचक ९९.२ सेंटर पॉईंट स्कूल, वर्धमाननगर२ प्रियादेवी सुथार ९८.६ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स३ हृदय गोलानी ९७.६ सेंटर पॉईंट स्कूल, वर्धमाननगर४ विश्वेश कुमार पारगी ९७.२ नारायणा विद्यालयम्५ जिया अग्रवाल ९७.० सेंटर पॉईंट स्कूल, काटोल मार्ग५ मिहीर उराडे ९७.० भवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगरविज्ञानक्रमांक नाव टक्के शाळा१ अरुणव भौमिक ९८.० सेंटर पॉईन्ट स्कूल, काटोल मार्ग२ आशना चोप्रा ९७.४ सेंटर पॉईन्ट स्कूल, काटोल मार्ग३ निशत बिरंजन ९७.० नारायणा विद्यालयम्३ तनिष्क कोहली ९७.० सेंटर पॉईन्ट स्कूल, वर्धमाननगर४ यश अग्रवाल ९६.६ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हील लाईन्स४ साक्षी बोरेकर ९६.६ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हील लाईन्स५ नकुल मुखी ९६.४ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर५ जान्हवी चौधरी ९६.४ सेंट पॉल सिनिअर सेकंडरी स्कूल, हुडकेश्वरमानव्यशास्त्रक्रमांक नाव टक्के शाळा१ केतकी मोघे ९८.६ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर२ प्रसाद केळकर ९७.९ केंद्रीयव विद्यालय, वायुसेनानगर२ खुशी पटेल ९६.८ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर३ अद्विका सराफ ९६.० सेंटर पॉईन्ट स्कूल, काटोल मार्ग४ निश्ता चांडक ९५.८ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर४ देवयानी टाले ९५.८ सेंटर पॉईन्ट स्कूल, काटोल मार्ग५ यशिका लालवानी ९५.४ सेंटर पॉईन्ट स्कूल, काटोल मार्ग

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाResult Dayपरिणाम दिवस