शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
5
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
6
हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
7
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
8
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
9
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
10
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
11
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
12
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
13
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
14
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
15
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
16
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
17
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
18
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
19
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
20
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क, कन्हान : पाेलिसांनी हनुमान मंदिराजवळील पाणंद रस्त्यावर कारवाई करत रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क, कन्हान : पाेलिसांनी हनुमान मंदिराजवळील पाणंद रस्त्यावर कारवाई करत रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून चालकास अटक केली. त्याच्याकडून एकूण ५ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. ४) मध्यरात्री १.३० ते २ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

राेशन सेवर लाेंढे (२८, रा. पंचशील नगर, सत्रापूर, कन्हान, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. कन्हान पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कन्हान परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी शहरालगतच्या हनुमान मंदिर परिसराची पाहणी केली. त्यात त्यांना पाणंद रस्त्यावरून विना क्रमांकाचा ट्रॅक्टर येताना दिसला. संशय आल्याने त्यांनी हा ट्रॅक्टर थांबवून झडती घेतली. त्याच्या ट्राॅलीत रेती असल्याचे आढळून येताच कागदपत्रांची कसून तपासणी केली.

त्यात ती रेती विना राॅयल्टी असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी रेतीसह ट्रॅक्टर ताब्यात घेत चालकास अटक केली. ती रेती कन्हान नदीवरील सिहाेरा रेती घाटातून आणली असल्याचे राेशन लाेंढे याने पाेलिसांना सांगितले. या कारवाईमध्ये पाच लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि तीन हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुनहा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक सुरजुसे करत आहेत.