एका चोरीच्या गुन्ह्यात पकडले, आणखी दोन चोरींचा उलगडा
By योगेश पांडे | Updated: May 18, 2024 16:35 IST2024-05-18T16:34:58+5:302024-05-18T16:35:49+5:30
Nagpur : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची कारवाई

Caught in one theft, two more thefts solved
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना पकडल्यावर त्यांच्या चौकशीतून आणखी दोन चोरीच्या प्रकरणांचा उलगडा झाला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
३० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास हितेश राजेंद्र वानखेडे (२१, अहिल्यानगर, जयताळा मार्ग) यांची मोपेड जयताळा परिसरातूनच चोरी गेली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला यात प्रज्वल संजय पाटील (२५, दव्हा, उमरेड) व शुभम बापू चौधरी (२७, पांढराबोडी, संजय नगर, अंबाझरी) हे सहभागी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सर्वेश उर्फ टिटू चंद्रशेखर परिहार (संजयनगर, पांढराबोडी) व दोन अल्पवयीन मुलांसह आणखी दोन वाहनचोरी केल्याची कबुली दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमएच ४० बीएम २०९२ व कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमएच ४९ एझेड २८१३ ही वाहने चोरल्याची त्यांनी माहिती दिली. दोन्ही आरोपींकडून १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले असून टिटूचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, सचिन बडिये, शेषराव राऊत, कुणाल मसराम, अश्विन मांगे, समीर शेख, नितीन वासने, पुनम शेंडे व आरती यांच्या पथकाने ही कारवाई केली.