करण तुली विरुद्धचा गुन्हा दखलपात्र होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:08 IST2020-12-30T00:07:21+5:302020-12-30T00:08:19+5:30

Karan Tuli case, crime newsहॉटेल व्यावसायिक आणि शिवसेना कार्यकर्ते करण तुलीविरुद्ध दाखल झालेला अदखलपात्र गुन्हा दखलपात्रमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

The case against Karan Tuli will be registered conizable | करण तुली विरुद्धचा गुन्हा दखलपात्र होणार

करण तुली विरुद्धचा गुन्हा दखलपात्र होणार

ठळक मुद्देरेडिओ जॉकीची तक्रार - मारहाणीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हॉटेल व्यावसायिक आणि शिवसेना कार्यकर्ते करण तुलीविरुद्ध दाखल झालेला अदखलपात्र गुन्हा दखलपात्रमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात रेडिओ जॉकी प्रीतम सिंग हा फिर्यादी आहे. आपण बिग बॉसच्या सीझन ८ चा स्पर्धक असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

शिवसेना कार्यकर्ते करण तुलीने आपल्याला शनिवारी रात्री कामगारनगर चौकात बोलविले. तेथे शिवसेनेच्या विरोधात कशाला बोलतो, असे विचारून जोरदार मारहाण केली, असे प्रीतम सिंगने कपिलनगर पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

करण आणि त्याच्या साथीदारापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही प्रीतम सिंगने तक्रारीत म्हटले आहे. कपिलनगरचे पोलीस निरीक्षक भीमराव पाटील यांनी रविवारी रात्री याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून प्रीतम सिंगचे मेडिकल करून घेतले. प्रीतमला गंभीर स्वरूपाची मारहाण असल्याचे डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणात दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्याची तयारी चालविल्याची माहिती कपिलनगर पोलिसांकडून मिळाली आहे. यासंबंधाने परिमंडळ - ५ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्याकडे विचारणा केली असता त्यांची वैद्यकीय अहवालाची पुष्टी केली. कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: The case against Karan Tuli will be registered conizable