शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

पैसे ग्राहकांचे, जाहिरात मॉल अन् कंपन्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 10:28 AM

ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद नसतानाही पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या नावाखाली मॉल, हॉटेल्स आणि सुपर बाजारात वस्तूंसोबत प्रिंटेड पेपर आणि प्लास्टिक कॅरी बॅग विकून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रिंटेड कॅरी बॅग विकण्याचा मॉल व हॉटेल्सचा नवा फंडाग्राहकांवर अनावश्यक भुर्दंड कशासाठी?हॉटेल्स, सुपर बाजारात थेट ग्राहकांच्या खिशात हातस्वत:च्या ब्रॅण्डिंगसाठी साऱ्यांची दुकानदारीकाही ठिकाणीच मिळतात साध्या बॅग

मोरेश्वर मानापुरे/मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद नसतानाही पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या नावाखाली मॉल, हॉटेल्स आणि सुपर बाजारात वस्तूंसोबत प्रिंटेड पेपर आणि प्लास्टिक कॅरी बॅग विकून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. नागपुरातील काही मॉल, हॉटेल्स, सुपर बाजारात थेट ग्राहकांच्या खिशात हात टाकून दररोज लाखो रुपये वसूल करण्यात येत आहेत. व्यावसायिक प्रतिष्ठानांनी ग्राहकांकडून पैसे घेऊन जाहिरातीचा नवीन फंडा सुरू केला आहे.लोकमतच्या चमूने शहरातील अनेक प्रसिद्ध मॉल्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना भेट दिली असता पेपर कॅरी बॅगच्या माध्यमातून ब्रॅण्डची जाहिरात लोकांकडूनच पैसे घेऊन होताना दिसून आली. काही प्रतिष्ठानांनामध्ये कॅरी बॅगचे पैसे कशाला, अशी विचारणा केली असता वस्तू न्यायची असेल तर कॅरी बॅगसाठी पैसे मोजावेच लागतील, असे सांगण्यात आले.चमूने पंचशील चौकातील बाटा कंपनीच्या शोरूममधून २९९ रुपयांची चप्पल खरेदी केली. चपलेचा बॉक्स हाती देताना कशी न्यायची अशी विचारणा केली असता कर्मचाºयाने बॅग हवी का, असे विचारले. त्याला हो म्हटल्यावर तीन रुपयाला मिळेल, असे सांगितले. कॅरी बॅगचे बिल मिळेल का, असे विचारले असता, त्याने कागदी बॅगचा उल्लेख करून बिलही दिले. पण त्या कॅरी बॅगवर बाटा कंपनीची जाहिरात प्रिंट होती.हल्दीरामच्या इतवारी येथील आऊटलेटमधून ४८ रुपयांत ताकाचे सहा पॅकेट विकत घेतले. ते घेऊन जाण्यासाठी कॅरी बॅग मागितली. यासाठी सहा रुपये द्यावे लागले. विशेष म्हणजे तिथे लहान कॅरी बॅग होती. त्यात सहज ताकाचे सहा पॅकेट येत होते. मात्र कर्मचाऱ्याने सहा रुपयांची पेपरची कॅरी बॅग दिली आणि त्याच्यावरही हल्दीरामची जाहिरात होईल, असे प्रिंट केले होते. वेस्ट हायकोर्ट रोडवरील मॅक्स लाईफस्टाईल इंटरनॅशनल प्रा.लि. येथून एका व्यक्तीने चार हजार रुपयांची खरेदी केली. खरेदी केलेल्या वस्तू नेण्यासाठी आठ रुपयांची पेपर बॅग देण्यात आली. त्या बॅगवर कंपनीचे ब्रॅण्डिंग होईल, असे छापले होते. बिग बाजारच्या रामदासपेठ येथील मॉलमध्ये चमूने पाहणी केली असता खरेदी केलेली वस्तू नेण्यासाठी कापडी पिशवी १५ रुपयात विकण्यात येत होती. यावरही बिग बाजार या ब्रॅण्डची जाहिरात प्रिंट करण्यात आली होती.येथे आकारत नाहीत कापडी पिशवीच्या मोबदल्यात पैसेत्याचबरोबर सीताबर्डी येथील श्री शिवम शोरूममधून एका व्यक्तीने कपड्यांची खरेदी केली. पण तिथे दिलेल्या कापडी पिशवीकरिता कुठलेही शुल्क आकारले नाही. त्या पिशवीवर प्रतिष्ठानाचे नाव प्रिंट होते.

कापडी पिशवी व पेपर कॅरी बॅग बंधनकारक नाहीलोकमत चमूने या सर्व प्रतिष्ठानांना भेट दिली असता वस्तू खरेदीनंतर कापडी पिशवी व पेपर कॅरी बॅगची खरेदी बंधनकारक नव्हती. पिशवी आहे का, असे विचारल्यानंतरच त्यांच्याकडून पिशवी पुरविण्यात येत होती. अन्यथा कुठलीही कॅरी बॅग घेणे बंधनकारक नव्हते. ग्राहकांनी वस्तू घरी नेण्यासाठी पिशवी सोबत आणावी, असेही कर्मचाऱ्याने सांगितले.

३ रुपयांच्या पेपर बॅगसाठी बाटा कंपनीला ९ हजारांचा दंडएका ग्राहकाच्या तक्रारीवर सुनावणी करताना चंदीगड येथील ग्राहक फोरमने रिटेल फूटवेअर बाटा कंपनीला ९ हजार रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्राहकाने ३९९ रुपयांचे जोडे खरेदी केल्यानंतर कंपनीची जाहिरात प्रिंट असलेल्या पेपर बॅगसाठी ३ रुपये अतिरिक्त आकारण्यात आले होते. ग्राहकाने याची तक्रार ग्राहक फोरमकडे केली होती. कंपनी स्वत:च्या प्रचारासाठी ग्राहकाकडून पैसे घेत असल्याचा ग्राहकाचा आरोप होता. फोरमने सुनावणी करताना ९ हजार रुपयांचा दंड ठोठावताना यापुढे वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोफत कॅरी बॅग देण्याचे आदेश बाटा कंपनीला दिले.

टॅग्स :consumerग्राहक