शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कारचालकाने चिमुकल्याला चिरडले

By admin | Updated: January 8, 2017 01:59 IST

वाहन चालविता येत नसतानादेखिल वेगात कार चालवून एका कारचालकाने चार वर्षाच्या बालकाला चिरडले. दक्ष गणेश टेकाडे असे मृत बालकाचे नाव आहे

बहीण अन् वडीलही गंभीर : मानकापुरात भीषण अपघात नागपूर : वाहन चालविता येत नसतानादेखिल वेगात कार चालवून एका कारचालकाने चार वर्षाच्या बालकाला चिरडले. दक्ष गणेश टेकाडे असे मृत बालकाचे नाव आहे. गोधनी रोड झिंगाबाई टाकळी परिसरात शनिवारी सकाळी घडलेल्या या भीषण अपघातात दक्षची सहा वर्षीय बहीण पूर्वा आणि वडील गणेश टेकाडे गंभीर जखमी झाले. झिंगाबाई टाकळी परिसरात फूल विक्रीचा व्यवसाय करणारे गणेश टेकाडे आज सकाळी १०.३० च्या सुमारास त्यांच्या दुचाकीने झिंगाबाई टाकळी परिसरातील शाळेत आपल्या मुलांना सोडण्यासाठी जात होते. दक्ष नर्सरीत तर पूर्वा केजी २ ला शिकत होती, असे समजते. अण्णाबाबानगरकडे जाणाऱ्या मार्गावरील एमबी टाऊन क्रमांक तीन समोर भरधाव कारने (एमएच ३१/ ईओ ९६६७) मोटरसायकलला जोरदार धडक मारली. त्यामुळे टेकाडे बापलेक दुचाकीसहीत बरेच अंतर रस्त्याने घासत गेले. गंभीर जखमी झालेल्या टेकाडे बापलेकांना परिसरातील नागरिकांनी डॉक्टरकडे नेले. तेथे डॉक्टरांनी चिमुकल्या दक्षला मृत घोषित केले. गणेश आणि पूर्वा या दोघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे घटनास्थळी काही वेळ प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच मानकापूर पोलीस घटनास्थळी धावले तर, आरोपी कारचालक चेतन शेषराव चौधरी (वय २२) पळून गेला. प्रशिक्षण नाही, परवानाही नाही आरोपी चौधरी याला वाहन चालविता येत नसून त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानादेखिल नसल्याचे पोलीस सांगतात. तरीसुद्धा तो रहिवासी भागातून वेगात कार चालवित होता. त्याच्या बाजूला सुरेश राऊत नामक साथीदार बसून होता, असे समजते. त्याच्या अविवेकीपणामुळे हसत्याखेळत्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे दक्षची आई आणि अन्य नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपी कारचालकाला अटक झालेली नव्हती.