शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड नगरपालिकेवर जप्तीचे संकट

By admin | Updated: May 19, 2014 00:52 IST

शहरात घरकुलांचे बांधकाम करणार्‍या कंत्राटदार संस्थेला करारनाम्यानुसार देयके न मिळाल्याने प्रकरण न्यायालयात पोहोचले. या प्रकरणी निर्णय देताना जिल्हा व सत्र न्यायालयाने नरखेड

 नरखेड : शहरात घरकुलांचे बांधकाम करणार्‍या कंत्राटदार संस्थेला करारनाम्यानुसार देयके न मिळाल्याने प्रकरण न्यायालयात पोहोचले. या प्रकरणी निर्णय देताना जिल्हा व सत्र न्यायालयाने नरखेड नगर परिषदेच्या मालमत्तेचे विवरण सादर करून सदर मालमत्तेचे जप्ती आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात पालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने जप्तीचे संकट अटळ असल्याचे बोलले जात आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी निर्मूलन योजनेंंतर्गत नरखेड शहरात घरकुलांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी केंद्र शासनाने ६५.३१२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. नगर परिषदेने सदर घरकुलांच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाचा कंत्राट रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्टला दिला. यासाठी कंत्राटदार ट्रस्टसोबत १६ मार्च रोजी करारनामाही करण्यात आला. मूळ प्रकल्प किंमतीच्या ३ टक्के रक्कम देण्याचा उल्लेख या करारनाम्यात करण्यात आला. सदर ट्रस्टने घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आणि नगर परिषदेकडे देयकांची मागणी केली. दरम्यान, नगर परिषदेकडे उपलब्ध असलेल्या निधीच्या ३ टक्के रक्कम देयकांपोटी कंत्राटदार ट्रस्टला देण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला. या निर्णयानुसार कंत्राटदार ट्रस्टला २ मे २०११ रोजी २० लाख रुपये, ६ जुलै २०११ रोजी १० लाख रुपये, २ फेबु्रवारी २०१२ रोजी ४६ लाख ६८ हजार ५०५ रुपये आणि उर्वरित १ कोटी २४ लाख ६ हजार ९८९ रुपये नगर परिषदेकडून घेणे होते. ही रक्कम न मिळाल्याने कंत्राटदार ट्रस्टने जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. यावर निर्णय देताना न्यायालयाने नगर परिषदेच्या जंगम मालमत्तेची माहिती न्यायालयात २८ मार्च २०१४ पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नगर परिषदेने या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत ११ जूनपर्यंत जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष अनिल गजबे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)