झारखंडमधील गांजा तस्कर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST2021-01-08T04:20:35+5:302021-01-08T04:20:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गांजाची खेप घेऊन नागपुरात आलेल्या रांची (झारखंड)मधील एका गांजा तस्कराला त्याच्या नागपुरातील साथीदारासह गिट्टीखदान ...

Cannabis smugglers arrested in Jharkhand | झारखंडमधील गांजा तस्कर जेरबंद

झारखंडमधील गांजा तस्कर जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गांजाची खेप घेऊन नागपुरात आलेल्या रांची (झारखंड)मधील एका गांजा तस्कराला त्याच्या नागपुरातील साथीदारासह गिट्टीखदान पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून २८ किलो गांजा जप्त करण्यात आला.

फिरोज अंसारी नूर मोहम्मद (वय ३२) असे त्याचे नाव आहे. तो काटाटोली, खेलगांव चौक रांची येथील रहिवासी आहे. हजारीपहाड नागपूर येथील रहिवासी शूभम ऊर्फ ढग्या श्रीराम करलुके (वय २१) याला गांजाची खेप देण्यासाठी फिरोज नागपुरात येणार असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना रविवारी मिळाली. त्यामुळे पोलिसांनी पाळत ठेवली. रविवारी सायंकाळी महापालिकेच्या रुग्णालयाजवळ पोलिसांना जेएच ०९-एल ९०८९ क्रमांकाची कार दिसली. ती थांबवून पोलिसांनी त्याची झडती घेतली असता कारच्या डिकीत प्लास्टिकच्या बोरीत २८ किलो गांजा आढळला. त्याची किंमत चार लाख २० हजार रुपये आहे. पोलिसांनी गांजा, पाच लाखांची कार आणि दोन मोबाईल असा एकूण नऊ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कारमध्ये फिरोजसोबत ढग्या बसून होता. त्या दोघांना अटक करण्यात आली. परिमंडळ दोनच्या उपायुक्त विनीता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली गिट्टीखदानचे ठाणेदार सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक दत्ता पेंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

----

Web Title: Cannabis smugglers arrested in Jharkhand