शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

घाण करणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर

By admin | Updated: January 8, 2017 02:22 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.

स्वच्छता अभियान : सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर होणार कारवाई नागपूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. नागपूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीत चांगले काम केल्याने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही मिळालेले आहेत. परंतु महापालिके ची कार्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणे आणि शौचालयाच्या भिंती पान व खर्रा खाणाऱ्यांच्या थुंकीमुळे रंगलेल्या आहेत. परंतु आता शहरात बसविण्यात येणाऱ्या चार हजार आयपी कॅमेऱ्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना आळा बसणार आहे. महापालिकेच्या झोन कार्यालयातील इमारती, शौचालयांच्या भिंती थुंकीमुळे विद्रूप झालेल्या आहेत. एवढेच नव्हे तर मुख्यालयातील जुन्या इमारतींमधील शौचालये व भिंतींची अशीच अवस्था आहे. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमधील शौचालयात खर्रा खाणाऱ्यांच्या थुंकीमुळे घाण साचलेली आहे. जुन्या इमारतीतही अशीच अवस्था आहे. बाजूलाच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. परंतु याकडे विभागाचे दुर्लक्ष आहे. महापालिका मुख्यालयात महापौर व आयुक्तांसह पदाधिकारी व अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत परंतु स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. जुन्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरील हिरवळीच्या आजूबाजूला कचरा व घाण नजरेस पडते. महापौरांच्या कक्षासमोरील भाग, निगम सचिवांच्या कार्यालयासमोरचा भाग व सत्तापक्ष नेत्यांच्या कार्यालया समोरील भागात तसेच वरच्या माळ्यावर जाण्याच्या पायऱ्यांवर जागोजागी थुंकीने भिंती व कोपरे विद्रूप झाल्याचे दिसून येते. नवीन इमारतीच्या पायऱ्या ठिकठिकाणी थुंकल्यामुळे विद्रूप झालेल्या आहेत. अग्निशमन विभागाच्या बाजूला दिव्यांगासाठी शौचालयाची सुविधा आहे. परंतु शौचालयात घाण पसरलेली आहे. शहरातील शासकीय कार्यालयातही अशीच परिस्थिती आहे. शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलाखाली ठिकठिकाणी घाण साचलेली आहे. खर्रा व पानांच्या थुंकीमुळे पुलाखालील परिसर विद्रूप केलेला आहे. परंतु आता स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात चार हजार आयपी कॅमेरे लागणार आहेत. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लघन करणाऱ्यांसोबतच सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना या कॅमेऱ्यात टिपले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण व विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.(प्रतिनिधी)