शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमु‌ळे बुडाला शालेय वस्तू विक्रीचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:12 IST

खापा : जून व जुलै महिना लागताच शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होते. मात्र यंदा ऑगस्ट महिना लागला ...

खापा : जून व जुलै महिना लागताच शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होते. मात्र यंदा ऑगस्ट महिना लागला असला तरी शालेय साहित्य विक्रीच्या दुकानांत शुकशुकाट आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. यंदा ग्रामीण भागात काही प्रमाणात शाळा सुरू झाल्या असल्या तरी कोविडमुळे अनेक पालकांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे बाजारात शालेय साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी नाही. केवळ दहावी व बारावीला असलेले विद्यार्थी शैक्षणिक साहित्याची खरेदी करीत आहेत. लॉकडाऊनचा फटका खापा शहरातील विक्रेत्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. खापा शहरामध्ये शालेय साहित्य विक्रीची १४ ते १५ दुकाने आहेत. या वर्षी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होतील अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वच व्यवसाय ठप्प झाले. याशिवाय शहरी भागात ऑनलाइन अध्यापन सुरू असल्याने व आठवीपर्यंतच्या शाळा कधी सुरू होतील, याबाबत अद्यापही ‌निर्णय झाला नसल्याने बाजारातील मंदी कायम राहील, असे शालेय साहित्य विक्रेत्यांचे मत आहे.

अनेकांनी बदलला व्यवसाय

शालेय साहित्याची विक्री होणार नसल्याची शाश्वती आल्याने अनेक विक्रेत्यांनी गतवर्षीपासून व्यवसाय बदलला आहे. काहींनी दुकानात सॅनिटाझर आणि मास्क विक्रीला सुरुवात केली आहे. याशिवाय काही विक्रेत्यांनी जनरल स्टोर्स सुरू केले आहेत.

गत दोन वर्षांत शालेय वस्तूंची विक्री कमी झाली. लाखोंची होणारी उलाढाल थांबल्यामुळे व्यवसाय बुडाला.

- सुधीर नाचनकर, खापा, शालेय वस्तू विक्रेता

दरवर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये शालेय वस्तूच्या खरेदीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी दुकानात गर्दी व्हायची. शाळा बंद असल्याने व्यवसाय बुडाला.

- अनिल बोकडे, खापा, शालेय वस्तू विक्रेता