राजस्थानला देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी
By योगेश पांडे | Updated: July 19, 2023 12:25 IST2023-07-19T12:25:09+5:302023-07-19T12:25:25+5:30
राजस्थानला देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी

राजस्थानला देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी
नागपूर : राजस्थानमध्ये देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी करण्यात आली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
भूषण रविंद्र पंडे (२९, अशोकनगर, क्वॉर्टर क्रमांक २६-ए) हे १२ जुलै रोजी कुटुंबियांसह राजस्थानात देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख ४१ हजार रुपये असा ७३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. घरी परत आल्यावर पंडे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.