'ती' अंत्यसंस्कारासाठी गेली अन् चोरट्यांनी संधी साधली; घर फोडून १.९५ लाखांचा मुद्देमाल लंपास

By दयानंद पाईकराव | Updated: August 26, 2023 14:18 IST2023-08-26T14:17:54+5:302023-08-26T14:18:13+5:30

सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Burglary in the house of a woman who had gone to a funeral; 1.95 lakhs worth of goods lost | 'ती' अंत्यसंस्कारासाठी गेली अन् चोरट्यांनी संधी साधली; घर फोडून १.९५ लाखांचा मुद्देमाल लंपास

'ती' अंत्यसंस्कारासाठी गेली अन् चोरट्यांनी संधी साधली; घर फोडून १.९५ लाखांचा मुद्देमाल लंपास

नागपूर : आपल्या राहत्या घराला कुलुप लाऊन गेलेल्या महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख असा एकुण १.९५ लाखांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरुन नेला. ही घटना सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान घडली.

कल्पना हरिशचंद्र घोडे (वय ५२, रा. सोमवारी क्वार्टर, सक्करदरा) असे चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या मेडिकलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्यामुळे त्या आपल्या राहत्या घराला कुलुप लाऊन उमरेड मार्गावरील शिर्सी येथे कुटुंबीयांसह गेल्या होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचा पितळी कोंडा तोडला.

चोरट्याने त्यांच्या घराच्या वरच्या माळ्यावरील बेडरुममधील लोखंडी आलमारीतून दागिने, मोबाईल व रोख ४० हजार असा एकुण एक लाख ९५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी कल्पना यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा ठाण्याचे उपनिरीक्षक गंगाधर दहिलकर यांनी आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: Burglary in the house of a woman who had gone to a funeral; 1.95 lakhs worth of goods lost