युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बंटी शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:30 IST2018-02-24T23:30:03+5:302018-02-24T23:30:17+5:30

युवक काँग्रेसचे नागपूर लोकसभा अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके यांना पक्षातर्फे प्रमोशन देण्यात आले आहे. त्यांची अ.भा. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Bunty Shelke as the National Secretary of Youth Congress | युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बंटी शेळके

युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बंटी शेळके

ठळक मुद्देभाजपविरोधी आक्रमक भूमिकेची घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवक काँग्रेसचे नागपूर लोकसभा अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके यांना पक्षातर्फे प्रमोशन देण्यात आले आहे. त्यांची अ.भा. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून बंटी शेळके हे सातत्याने भाजपा विरोधात आंदोलने करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘संघ ते मोदी’ अशी नागपूर ते वाराणसी यात्रा काढली होती. भाजपा नेत्यांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात शेळके यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या या कामाची पक्षातर्फे दखल घेण्यात आली आहे.

 

Web Title: Bunty Shelke as the National Secretary of Youth Congress