शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

शेतकऱ्यांसह दुर्बल घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : ऊर्जामंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 7:11 PM

राज्यातील शेतकऱ्याला समृद्ध करणे व ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा, ओबीसी मुला-मुलींना सवलत तसेच पाचवी ते दहावीतील मागास मुलींना शिष्यावृत्ती योजना जाहीर करून शैक्षणिक विकास साधणारा व दुर्बल घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकऱ्याला समृद्ध करणे व ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणारा, ओबीसी मुला-मुलींना सवलत तसेच पाचवी ते दहावीतील मागास मुलींना शिष्यावृत्ती योजना जाहीर करून शैक्षणिक विकास साधणारा व दुर्बल घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.विधिमंडळात मंगळवारी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सन २०१९-२० चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, ऊर्जा विभाग अधिक मजबूत करून शेतकऱ्यांना पूर्णदाबाने वीज पुरवठा करता यावा म्हणून विदर्भ-मराठवाड्यातील प्रलंबित कृषी पंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे कनेक्शन देण्यासाठी लागणारा १९५४ कोटी रुपये अर्थसंकल्पातून महावितरणला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात ही योजना राबवण्यासाठी २५४२ कोटीचा निधी खुल्या बाजारातून उभारण्यास शासनाने या अर्थसंकल्पातून मंजुरी दिली आहे.भारनियमनमुक्त असलेल्या महाराष्ट्रात विजेचे प्रमाण मुबलक आहे. मात्र भविष्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन १३२० मेगावॅटच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाला लागणाऱ्या ८ हजार ४०७ कोटींना अर्थमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली. यामुळे राज्यात भविष्यात विजेची टंचाई जाणवणार नाही.वृद्ध, निराधार, दिव्यांग, विधवा या समाजातील दुर्बल घटकांना या अर्थसंकल्पातून मदतीचा हात अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिला आहे. दुर्बल घटकांचे जीवन सुसह्य व्हावे म्हणून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजनांमार्फत मिळणाऱ्या ६०० रुपये अर्थसाहाय्यावरून १०० रुपये वाढ करण्यात आली आहे. कोणतीही करवाढ न सुचवणारा व समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असून, आपण या अर्थसंकल्पाचे स्वागत करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBudget 2019अर्थसंकल्प 2019Maharashtraमहाराष्ट्र