शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

Budget 2020: करप्रणाली सोपी करण्याच्या प्रयत्नांत अर्थसंकल्पामुळे अधिकच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 4:51 AM

प्राप्तिकर भरणे करदात्यांसाठी किचकट आणि गुंतागुंतीचे होणार

- सोपान पांढरीपांडे

नागपूर : करप्रणाली सोपी करण्याच्या प्रयत्नांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोंधळ उडविणारा अर्थसंकल्प सादर केल्याचे दिसत आहे. प्राप्तिकराचे नवीन दर जाहीर झाल्याने गोंधळच उडणार आहे. करदात्यांना जुन्या दराप्रमाणे कर भरण्याची मुभा ठेवताना नवीन करप्रणालीही ऐच्छिक ठेवली आहे. नव्या प्रणालीत करदात्यांना स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार नाही. जुन्या प्रणालीत तो मिळेल. याशिवाय पगारदार करदात्यांचा टीडीएस कापला जाईल की नाही, याचा खुलासा कंपन्यांना करावा लागेल. त्यामुळे प्राप्तिकर भरणे करदात्यांसाठी किचकट आणि गुंतागुंतीचे होणार आहे.

शिवाय कंपनीकर व व्यक्तिगत प्राप्तिकर यांचे ४.८३ लाख करविवाद वेगवेगळ्या न्यायाधिकरणात प्रलंबित आहेत. ते मिटविण्यासाठी ‘सबका विश्वास’च्या धर्तीवर ‘विवाद से विश्वास’ योजना सरकारने आणली आहे. ‘लोकमत’चे हे भाकीत खरे ठरले, पण या योजनेत दंड आणि व्याज न भरता सहभागी होण्याची मुदत ३१ मार्च, २०२० असल्याने दोन महिन्यांत कर्जदात्यांना हा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे या योजनेचा नेमका किती फायदा होईल, हा प्रश्नच आहे.

अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी सीतारामन यांनी काही प्रयत्न केले आहेत. त्यात नॅशनल टेक्सटाइल मिशनसाठी १,४८० कोटी, पायाभूत क्षेत्रासाठी १ लाख ३ हजार कोटी रुपयांची नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन, बांधकाम उद्योगातून रोजगार निर्मितीसाठी २,५०० किमीचे हायवे, ९,००० किमीचे इकॉनॉमिक कॉरिडॉर, २,००० किमीचे कोस्टल रोड हे प्रस्ताव आहेत, तसेच ६,००० किमीचे नॅशनल हायवे खासगी कंपन्यांना संचालनासाठी देण्याची योजना आहे, पण फास्टॅग योजना यशस्वी झाली नसताना हे कसे शक्य होणार, हा प्रश्न आहे.

दळणवळण व मालवाहतूक या क्षेत्रावर १ लाख ७ हजार कोटी खर्च करण्याची योजना आहे, तसेच २०२४ पर्यंत १०० नवे विमानतळ बांधण्याचा संकल्प आहे. हे अतिशयोक्त वाटते. ऊ र्जा व रिन्युएबल ऊर्जा क्षेत्रावर २२ हजार कोटी रुपये तरतूद स्वागतार्ह आहे.लघू व मध्यम उद्योग, मोठे उद्योग, आर्थिक बाजार या क्षेत्रांसाठी बजेटमध्ये भरघोस तरतूद आहे. हे करताना वित्तीय तूट ८ लाख ४० हजार कोटींवर जाईल, असा अंदाज आहे.

बजेटमध्ये २०२०-२०२१ साठी उत्पन्न २२ लाख ४६ हजार कोटी तर खर्च ३० लाख ४२ हजार कोटी दाखविला आहे. त्यामुळे वित्तीय तूट जीडीपीच्या साडेतीन टक्के राहण्याचा अंदाज आहे. फिस्कल रीस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅण्ड बजेट मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (एफआरबीएम कायदा) अंतर्गत ही तूट जीडीपीच्या साडेतीन टक्के हवी. त्याकडे सीतारामन यांचे दुर्लक्ष झाले आहे. ते करताना सीतारामन यांनी सरकारची बाजारातून कर्ज उभारण्याची मर्यादा गेल्या वर्षीच्या ४ लाख ९९ हजार कोटींवरून ५ लाख ३६ हजार कोटी केली आहे. याचा अर्थ सरकार कर्ज काढून अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करणार आहे, हे योग्य नाही.

गती मिळणार तरी कशी?

अर्थसंकल्पातील डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स अंदाजाप्रमाणे मागे घेतला गेला आहे. त्यामुळे एकाच उत्पनावर दोनदा करभरणा होणार नाही. नव्या वीजनिर्मिती कंपन्यांना १५ टक्के कंपनीकराची सवलत, विदेशी गुंतवणूक फंडांना प्राधान्यक्रम असलेल्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केल्यास कंपनीकरातून १०० टक्के सूट, सहकारी संस्थांना ३0 टक्क्यांहून २२ टक्के प्राप्तिकर आणि व्यापारी बँकांच्या ठेवींवरील विमा संरक्षणाची मर्यादा एक लाखांवरून पाच लाख रुपये या बाबी समाधानाच्या आहेत, पण त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेला गती कशी मिळणार, हा प्रश्न शिल्लक राहतोच.

टॅग्स :budget 2020बजेटIncome Taxइन्कम टॅक्सbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनTaxकरIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र