शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’ लवकरच साकारणार

By admin | Updated: April 30, 2015 02:30 IST

देशविदेशातील विद्यार्थ्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बुद्धिस्ट स्टडी सेंटर दिले आहे.

नागपूर : देशविदेशातील विद्यार्थ्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बुद्धिस्ट स्टडी सेंटर दिले आहे. यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. परंतु मागील आठ वर्षांपासून या सेंटरच्या इमारतीचे काम रखडलेलेच होते. लोकमतने केलेल्या पाठपुराव्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला अखेर जाग आली असून सेंटरच्या कामाला तातडीने सुरुवात होत आहे. येत्या बुद्धपौर्णिमेला इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनसुद्धा होणार आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी देशविदेशातील विद्यार्थी भारतात मोठ्या प्रमाणावर येतात. नागपूर हे बौद्ध आंबेडकरी चळवळीचे केंद्र समजले जाते. या पार्श्वभूमीवर आणि विद्यापीठाने केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने नागपूर विद्यापीठाला बुद्धिस्ट सेंटरची परवानगी दिली. यासाठी निधीसुद्धा मंजूर केला. एक कोटीच्या घरात हा निधी असल्याचे सांगण्यात येते. आठ वर्षांपूर्वी हा निधी विद्यापीठाकडे प्राप्त झाला. सुरुवातीला हे सेंटर कुठे करावे यावर बराच विचार झाला. बुद्धिस्ट सेंटरची इमारत उभारण्यासाठी अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस परिसरातील जागा शोधण्यात आली. मात्र त्याला अनेकांचा विरोध होता. त्यानंतर रामदासपेठ येथील विद्यापीठ लायब्ररी, डॉ. आंबेडकर थॉट्स आणि बुटी सभागृह या तीन इमारतींच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर जागा असल्याचे अनेक मान्यवरांनी सुचविले. जागा पाहण्यात आली. बुद्धिस्ट सेंटरसाठी ही जागा योग्य राहील, असा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु या जागेवर मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे होती. यावर आक्षेप घेण्यात आला. महापालिकेकडे झाडे तोडण्याची परवानगी मागण्यात आली. या प्रक्रियेसाठी दीड वर्षाचा कालावधी गेला. महापालिकेने मंजुरी दिली. दोन वर्षांपूर्वी झाडे तोडण्यात आली. तेव्हा इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. परंतु झाडे तोडून जागा मोकळी करण्यात आली. तेव्हापासून त्या जागेकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी तोडलेल्या झाडांना पुन्हा पालवी फुटली. ती झाडे पुन्हा मोठी होऊ लागली. त्यामुळे इमारतीच्या बांधकामासाठी पुन्हा एकदा झाडांची अडचण निर्माण झाली. दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या विद्यापीठ अ‍ॅकेडेमिक कौन्सिलच्या बैठकीत सदस्य डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी यासंबंधातील प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा कुलगुरूंनी विद्यापीठाच्या इंजिनियरला इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्यानंतरही विद्यापीठ प्रशासनातर्फे बुद्धिस्ट स्टडीच्या इमारतीच्या कामाबाबत कुठलीही हालचाल सुरू झाली नव्हती. लोकमतने बुद्धिस्ट स्टडी सेंटरचा प्रश्न सुरुवातीपासून लावून धरला होता. पाली प्राकृत व आंबेडकर थॉट्स विभाग आणि रिपब्लिकन मुव्हमेंटसह अनेक सामाजिक संघटनांनी यासंबंधात वेळोवेळी आवाज उचलला होता. अखेर लोकमत आणि सामाजिक संघटनांची दखल विद्यापीठ प्रशासनाला घ्यावी लागली. येत्या बुद्ध पौर्णिमेला केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि बुद्धगयेतील भंते सत्यपाल यांच्या विशेष उपस्थितीत बुद्धिस्ट स्टडी सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे बुद्धिस्ट स्टडी सेंटर लवकरच साकारणार आहे. (प्रतिनिधी)