चक्क बीएसएनएल कार्यालयच चोरट्यांकडून ‘टार्गेट’
By योगेश पांडे | Updated: April 4, 2023 16:46 IST2023-04-04T16:42:32+5:302023-04-04T16:46:08+5:30
सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

चक्क बीएसएनएल कार्यालयच चोरट्यांकडून ‘टार्गेट’
नागपूर : बीएसएनएल कार्यालयातून दीड लाखांच्या कॉपर केबलची चोरी झाली. सक्करदरा येथील कार्यालयात हा प्रकार घडला.
या कार्यालय परिसरात ५० ते ६० मीटर कॉपर केबल ठेवली होती. बीएसएनएलचे उपमंडळ अभियंता दामोदर शंभरकर (४५) यांनी ३ एप्रिल रोजी कार्यालयाची पाहणी केली असता संबंधित केबल गायब असल्याचे निदर्शनास आले. या केबलची किंमत सुमारे दीड लाख इतकी होती. त्यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीचा तपास सुरू आहे.