नागपुरात आरपीएफने पकडली ब्राऊन शुगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 20:26 IST2021-06-02T20:25:19+5:302021-06-02T20:26:05+5:30
Brown sugar seized रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक ४ वर दुपारी ३.३० वाजता महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राऊन शुगर पकडून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली.

नागपुरात आरपीएफने पकडली ब्राऊन शुगर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक ४ वर दुपारी ३.३० वाजता महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून ब्राऊन शुगर पकडून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केली.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एच. एल. मीना, सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, आरपीएफ जवान नवीनकुमार सिंह आणि अजय सिंह हे दुपारी ३.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ४ वर गस्त घालत होते. त्यावेळी महाराष्ट्र एक्स्प्रेसची तपासणी करीत असताना डीएल ०१ कोचच्या साइडच्या सीटवर एक काळ्ळाया रंगाची बेवारस बॅग त्यांना आढळली. बॅगबाबत आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता या बॅगवर कोणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यानंतर ही बॅग आरपीएफ ठाण्यात आणून उघडली असता त्यात ब्राऊन रंगाचे पावडर आढळले. तपासासाठी हे पावडर एनडीपीएस सेलला पाठविण्यात आले. त्यानंतर ही ब्राऊन शुगर असल्याचे निष्पन्न झाले. तहसीलदार आणि दोन पंचांसमक्ष पंचनामा करून ब्राऊन शुगर पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.