लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाºया दलालास रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक करून त्याच्याकडून १५,६१७ रुपये किमतीच्या ७ रेल्वे तिकिटे आणि ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या आदेशानुसार तसेच निरीक्षक रवी जेम्स यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक एस. पी. सिंह, सुरेश डुलगच, उषा तिग्गा, अश्विन पवार, अमित बारापात्रे यांनी पारडी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. पारडी परिसरात प्लॉट नं. ८७, सी. ए. रोड जगजीवन हायस्कूलजवळ एका घरावर धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपीने आपले नाव शरद भगवान मेश्राम (३०) रा. पारडी असे सांगितले. चौकशीत त्याच्याजवळ आयआरसीटीसीचे लायसन्स नसल्याचे स्पष्ट झाले. ग्राहकांनी मागणी केल्यास तो एका तिकिटावर २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन ई-तिकीट देत होता. त्याच्याजवळील मोबाईलची अश्विन पवार यांनी तपासणी केली असता विविध पर्सनल आयडीवरून त्याने एकूण ७ रेल्वे तिकिटे किंमत १५,६१७ रुपये दिल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडील लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल जप्त करण्यात आला. गरजू ग्राहकांना ई-तिकीट देत असल्याचे आरोपीने चौकशीत मान्य केले. त्याच्याविरुद्ध आरपीएफ अक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:49 IST
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाºया दलालास रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक करून त्याच्याकडून १५,६१७ रुपये किमतीच्या ७ रेल्वे तिकिटे आणि ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : १५,६१७ रुपयांच्या तिकीट केल्या जप्त