शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

तुटली का रे...

By admin | Updated: September 20, 2014 01:57 IST

शिवसेना-भाजप यांची २५ वर्षापासूनची युती तुटणार,

भाजप-सेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ : मुंबईकडे लक्ष, दिवसभर विचारणानागपूर: शिवसेना-भाजप यांची २५ वर्षापासूनची युती तुटणार, अशा बातम्या शुक्रवार सकाळपासूनच वृत्तवाहिन्या देऊ लागल्याने अस्वस्थ झालेले दोन्ही पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते दिवसभर युतीच्या भवितव्याबाबत मुंबईतील नेत्यांशी संपर्कात होते. ‘तुटली का ?’असा सवाल फक्त युतीतीलच कार्यकर्ते विचारत होते असे नव्हे तर आघाडीतूनही याबाबत विचारणा होत होती.जागा वाटपाच्या मुद्यावरून दोन्ही पक्षात गेल्या एक आठवड्यापासून असलेला तणाव काही दिवसात अधिक वाढला. युतीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला असतानाच शुक्रवारी सकाळपासूनच युती तुटली अशा बातम्या वृत्तवाहिन्या प्रश्नार्थक चिन्ह लावून देऊ लागल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची अस्वस्थता अधिक वाढली. शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या एक दिवस आधी अशी स्थिती निर्माण झाल्याने युती तुटली तर पुढे काय यावरही चर्चा सुरू झाली. भाजपमधील स्थानिक नेते प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे हे मुंबईत असल्याने शिवसैनिक त्यांच्याशी संपर्क ठेवून होते. काय झाले, युती राहणार की भंगणार, असा सवाल दर तासागणिक कार्यकर्ते परस्परांशी करीत होते. मुंबईतील नेत्यांशी बोलणी होत होती. मात्र दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत संदिग्ध उत्तरे मिळत असल्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आणखी वाढत चालली होती. सायंकाळ नंतर हा प्रकार किंचित निवळला. मुंबईत गेलेले स्थानिक नेते बोलू लागले. अद्याप स्थिती हाताबाहेर गेली नाही, काळजी करू नका असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. मात्र त्याच वेळी युती होणारच असे ते स्पष्टपणे सांगतही नव्हते. त्यामुळे सायंकाळपर्यंत तरी ‘तुटली का रे’ यावरील उत्तर सध्या तरी नाही एवढेच होते. (प्रतिनिधी)सन्मानजनक तोडगा काढावामहायुती कायम राहावी ही भाजपची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र शिवसेनेने त्यांच्या भूमिकेत थोडा बदल करण्याची गरज आहे. भाजपच्या शक्तीत झालेली वाढ त्यांनी मान्य करावी आणि थोडं मोठ मन करावे. भाजप युतीसाठी नेहमीच अनुकूल आहे. कृष्णा खोपडे, शहर अध्यक्ष, भाजपा स्थिती निवळेलभगव्या झेंड्याखाली काम करणाऱ्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे युतीशी भावनिक संबंध जुळले आहेत. सेना आणि भाजप हे भावंडाप्रमाणे आहेत. त्यांच्यात मतभेद असले तरी मनभेद नाही. त्यामुळे परिवर्तनासाठी दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जातील.शेखर सावरबांधेजिल्हा प्रमुख, शिवसेना