शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

लाचखोर प्रकरण :  देहव्यापार सूत्रधार निघाला ‘पोलिसाचा पंटर’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:32 AM

पोलिसांकडे सेटिंग करण्याची बतावणी करून १५ हजार रुपयांची लाच घेताना आणि एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला रजत ठाकूर देहव्यापाराचा सूत्रधार समजला जात आहे. तो देहव्यापाराच्या प्रकरणात जामिनावर सुटला आहे. रजत एसीबीच्या चमूसमोरच फरार झाल्यामुळे या प्रकरणाशी जुळलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे त्याला पाठबळ असल्याच्या शंकेला बळ मिळाले आहे.

ठळक मुद्देसीआरपीएफमध्ये निलंबित, पोलीस अधिकारी आहेत नातेवाईक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांकडे सेटिंग करण्याची बतावणी करून १५ हजार रुपयांची लाच घेताना आणि एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला रजत ठाकूर देहव्यापाराचा सूत्रधार समजला जात आहे. तो देहव्यापाराच्या प्रकरणात जामिनावर सुटला आहे. रजत एसीबीच्या चमूसमोरच फरार झाल्यामुळे या प्रकरणाशी जुळलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचे त्याला पाठबळ असल्याच्या शंकेला बळ मिळाले आहे.रजतने देहव्यापार प्रकरणात लिप्त असलेल्या आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे सांगून सामाजिक सुरक्षा दलाच्या एका कर्मचाऱ्याच्या नावावर ५० हजार रुपये मागितले होते. आरोपीच्या पत्नीने याची तक्रार एसीबीकडे केली होती. त्या आधारावर मंगळवारी सायंकाळी चिल्ड्रेन पार्कजवळ रजतला रंगेहात पकडले होते. गुन्ह्याची नोंद करण्यासाठी सीताबर्डी ठाण्यात आणताना तो एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. २४ तासानंतरही रजतचा ठावठिकाणा लागलेला नाही. प्रारंभी रजतला पोलिसाचा पंटर असल्याचे सांगितले होते, पण बारकाईने चौकशी केली असता तो देहव्यापारात लिप्त असल्याचे आढळून आले.बजाजनगर पोलिसांनी ९ मार्चला परांजपेनगर येथील आशिष टॉवरमध्ये धाड टाकून रजत आणि विक्की खोब्रागडेला अटक केली होती. त्या ठिकाणी दोन तरुणी मिळाल्या होत्या. या अड्ड्याचा सूत्रधार बालाघाट निवासी स्वप्निल गुप्ता होता. तो पोलिसांना सापडला नव्हता. त्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांकडून विरोध होऊ नये आणि देहव्यापाराला संरक्षण मिळवून देण्याचे सांगून रजत त्याला पैसे मागू लागला. रजत सीआरपीएफमध्ये शिपाई होता. ड्युटीवर अनुपस्थित राहिल्याच्या कारणामुळे त्याला दोन वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो बेरोजगार होता. या दरम्यान तो गुप्तासोबत देहव्यापारात जुळला. त्याला गुप्तासोबत सीताबर्डी परिसरात देहव्यापार करताना अटक करण्यात आली होती.रजतचे पोलिसांसोबत घनिष्ट नाते आहे. त्याचे सासरे पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे तो नेहमीच पोलिसांच्या संपर्कात असतो. सूत्रांच्या माहितीनुसार ९ मार्चला बजाजनगर पोलिसांनी त्याला अटक केली, तेव्हा पोलीस विभागातील अनेकजण त्याच्या बचावासाठी पुढे आले होते. बजाजनगर ठाण्यातील मास्टरमाईंड सचिनच्या माध्यमातून रजतला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सचिन अयशस्वी ठरल्यानंतर गुन्हे शाखेतील काही चर्चित अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय झाले होते. पण बजाजनगर पोलिसांपुढे कुणाचीही डाळ शिजली नाही. हे पाहून रजतने स्वत:चे नाव रुपेश गौतम ठाकूर सांगितले होते.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागSex Racketसेक्स रॅकेट