शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ब्राम्हणवादाला खतपाणी घालणाऱ्या महिलाच! नंदकुमार बघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 21:22 IST

जुन्या रूढीपरंपरांचा वारसा पुढे नेण्यात महिलाच अग्रेसर राहिल्या आहेत. ब्राह्मणवादी परंपरांना खतपणी घालण्याचे प्रमुख कार्य महिलांनीच केले आहे.

ठळक मुद्देओबीसी महिला साहित्य संमेलनाचा समारोपरूढीपरंपरांचा वारसा स्त्रियांनी नाकारावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या रूढीपरंपरांचा वारसा पुढे नेण्यात महिलाच अग्रेसर राहिल्या आहेत. ब्राह्मणवादी परंपरांना खतपणी घालण्याचे प्रमुख कार्य महिलांनीच केले आहे. त्यामुळे, आधी हा वारसा महिलांनी नाकारावा. त्याची सुरुवात नागपुरातून या संमेलनाच्या निमित्ताने झाली असल्याची भावना छत्तीसगड येथील ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार बघेल यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्यावतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवन येथे पार पडलेल्या द्विदिवसीय पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर छत्तीसगड येथील राजदा संपत्ती मंडळाचे अध्यक्ष विवेक वासनिक, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, ओबीसी लेखिका रेखा ठाकूर, डॉ. शरयू तायवाडे, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे उपस्थित होते.रूढीपरंपरा स्त्रियांनी नाकारल्या तरच त्या संपुष्टात येतील. या संमेलनाच्या निमित्ताने तसे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. ज्या ब्राह्मणवादी विचारधारेने महिलांना अजूनही मंदिर प्रवेश नाकारला, त्याच विचाराचा वारसा टिकविण्याचे कारण नाही. जगात रामासारखी दुसरी दुष्ट व्यक्ती नाही. ज्या रामाने स्वत:च्या पत्नीला सन्मानजनक वागणूक दिली नाही, तो आदर्श कसा होऊ शकतो, असा सवालही बघेल यांनी यावेळी उपस्थित केला. ‘युद्ध नको बुद्ध हवा’ या घोषणेची गर्जना ओबीसी महिलांनी संपूर्ण देशात करावी आणि खऱ्या क्रांतीला सुरुवात करावी, असे आवाहन बघेल यांनी यावेळी केले.संमेलनाध्यक्ष विजया मारोतकर यांनी समारोपीय भाषणात सर्वमताने ठराव पारित केल्याचे जाहीर केले. अ‍ॅड. समीक्षा गणेशे आणि अ‍ॅड. रेखा बाराहाते यांनी ठरावांचे वाचन केले. प्रा. माधुरी गायधनी यांनी संचालन केले.यावेळी, सुषमा भड, अरुणा भेंडे, प्रज्वला तट्टे, नंदा देशमुख, अ‍ॅड. अंजली साळवे, कल्पना मानकर, अवंतिका लेकुरवाळे, प्रा. संध्या राजूरकर, प्रा. माधुरी गायधनी, निर्मला मानमोडे, उषा देशमुख, मीना भागवतकर, अर्चना बरडे, अरुणा भोंडे, अनिता ढेंगरे, साधना बोरकर, प्रा. डॉ. वीणा राऊत, प्रांजल ताल्हन, लक्ष्मी सावरकर, कुमुद वर्षे, उषा माहुरे, उज्वला महाले, शुभांगी घाटोळे, प्रांजल वाघ उपस्थित होते.बाबासाहेबांनी दिला दलितांना राजसन्मान - विवेककुमार वासनिकडॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच दलिताना राजसन्मान मिळत आहे. छत्तीसगडमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. संविधानाचे विवेचन करण्याची क्षमता राज्यकर्त्यांमध्ये नाही. महिलाच समाजाला पुढे नेणार असून, याची ठिणगी या संमेलनातून पडली असल्याचे विवेककुमार वासनिक यावेळी म्हणाले.साहित्यातून वास्तववादी लिखाण व्हावे - शरयू तायवाडेसंत साहित्यासह आधुनिक साहित्यातही महिलांनी मोठे लिखाण केले आहे. वर्तमानातही वास्तववादी लिखाणावर महिलांनी भर द्यावा. प्रस्थापितांच्या व्यासपीठावर बहुजन महिलांना व्यक्त होण्याची संधी दिली जात नसल्याने, ओबीसी महिलांनी स्वत:चे व्यासपीठ निर्माण करावे, असे आवाहन डॉ. शरयू तायवाडे यांनी यावेळी केले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीWomenमहिलाliteratureसाहित्य