अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:08 IST2021-04-22T04:08:59+5:302021-04-22T04:08:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुटीबोरी : कंपनीतून घरी परत जात असलेल्या कामगारांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दोघांचा ...

Both died in an unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

बुटीबोरी : कंपनीतून घरी परत जात असलेल्या कामगारांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. बुटीबोरी एम. आय. डी. सी. पोलीस स्थानक हद्दीतील फाईव्ह स्टार गार्डन चौकात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. गफ्फार इसाक शेख (५०) आणि केशव नारायण कातुरे (५०) अशी मृतांची तर देवराव खंडाते (५२) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक आणि जखमी हे बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील इंडोरामा कंपनीत कंत्राटी कामगार होते. एकाच ठिकाणी कामाला असल्याने ते नेहमी सोबतच ये-जा करायचे. मंगळवारी कामावरून सुट्टी झाल्यानंतर ते दुचाकी क्रमांक (एमएच ४० के ९५४४)ने ट्रिपल सीट घरी परत जात असताना रात्री १०.३०च्या सुमारास एम. आय. डी. सी.तील फाईव्ह स्टार गार्डन चौकात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार दीप पांडे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांनाही उपचारार्थ बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान गफ्फार इसाक शेख आणि केशव नारायण कातुरे यांना मृत घोषित केले. देवराव खंडाते यांच्यावर उपचार सुरू आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Web Title: Both died in an unidentified vehicle collision