शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मध्य भारतातील बुकींनी केली शेकडो कोटींची दुबईत लगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 07:30 IST

Nagpur News मध्य भारतातील बुकींनी वेगवेगळ्या ॲपचा वापर करून हजारो कोटींची खयवाडी केली आणि थेट दुबईत कटिंग (लगवाडी) केली.

ठळक मुद्देआयपीएलमध्ये नागपूर राहिला सट्टेबाजांचा हॉटस्पॉटफंटर हरले, बुकींनी मारला डाव

नरेश डोंगरे 

नागपूर : क्रिकेट विश्वातील कोट्यवधी रसिकांसाठी पर्वणी ठरलेल्या आयपीएलमध्ये नेहमीप्रमाणे बुकींनी बाजी मारली. मध्य भारतातील बुकींनी वेगवेगळ्या ॲपचा वापर करून हजारो कोटींची खयवाडी केली आणि थेट दुबईत कटिंग (लगवाडी) केली. विशेष म्हणजे, यावेळीच्या सिझन दरम्यान पोलिसांकडून छापेमारी अथवा दुसरा कसलाही त्रास न झाल्याने बुकी बिनधास्त होते. त्यांनी शुक्रवारच्या अंतिम सामन्यात एकट्या नागपुरातून सुमारे ५०० कोटींची लगवाडी खयवाडी करून घेतल्याचे वृत्त आहे.

क्रिकेटच्या सट्टा बाजारात आंतरराष्ट्रीय बुकींसाठी नागपूर हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र असून, मध्य भारतातील सट्टा बाजार नागपुरातून संचालित केला जातो. केवळ बेटिंग नव्हे तर दोन दोन हजार कोटींची मॅच फिक्स करणारे बुकी (फिक्सर) नागपुरात असल्याचा खुलासा पाच वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांनी केला होता. त्या वेळी क्रिकेटपटू श्रीशांत, विंदू दारासिंगसह, नागपुरातील सुनील भाटिया, मुन्ना डोले आणि बुकी अग्रवाल बंधूलाही दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्याचवेळीच्या चाैकशीत नागपुरात ५०० पेक्षा जास्त छोटे-मोठे बुकी असल्याचेही उघड झाले होते. ही कल्पना असल्याने गेल्या वर्षी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील बड्या बुकींना सीताबर्डीतील उपायुक्तांच्या कार्यालयात बोलावून जबरदस्त ‘पेशगी’ दिली होती. त्यामुळे गेल्या वर्षी अनेक बुकी नागपुरात पळून गेले होते. काही मोठे बुकी गोव्यात तर त्यांचे हस्तक भंडारा-गोंदियात पोलिसांच्या मदतीने अड्डे थाटून बसले होते. काहींनी लपतछपत ग्रामीणमध्ये आश्रय शोधला होता.

यावेळी मात्र बुकींचा म्होरक्या मानला जाणाऱ्या अलेक्झांडरने राजरोसपणे नागपूर शहरासोबतच नागपूर ग्रामीणमध्येही स्वत:सह अनेकांचे अड्डे थाटून आयपीएलच्या सिझनमध्ये हजारो कोटींची खयवाडी केली. आयपीएलच्या संपूर्ण सिझनमध्ये नागपूर सेंटर क्रिकेट सट्टेबाजांचा हॉटस्पॉट राहिला असून मध्य भारताच्या सट्टा बाजारात एकट्या नागपुरातून अंतिम सामन्यावर पाचशे कोटींची लगवाडी खयवाडी झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी नागपूरचे अनेक बुकी रायपूर, दिल्ली, मुंबई, भोपाळ, गोवा आणि हैदराबादच्या बुकींशी कनेक्ट होते. यंदा अनेक बुकींनी थेट दुबईतच संधान साधले होते. अंतिम सामन्यात फंटरचे डाव उलटे पडल्याने बुकींची सरशी झाली.

---

 

पोलिसांची भूमिका ठरली लक्षवेधी

क्रिकेट सामन्याच्या सिझनमध्ये बुकींचे डाव आणि पोलिसांचे छापे हा नियमित प्रकार आहे. दरवर्षी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करून बुकींना पकडतात. या वर्षी मात्र कोणताही मोठा बुकी अथवा मोठ्या बुकींच्या हस्तकांकडे पोलिसांची कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलिसांना बुकींच्या अड्ड्यांचा पत्ताच चालला नाही की दुसरे काही कारण होते, हा आयपीएल सिझनदरम्यान चर्चेचा विषय ठरला. याचमुळे पोलिसांची भूमिकाही लक्षवेधी ठरली आहे.

----

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी