नागपुरात पडक्या घरात मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 22:14 IST2020-06-12T22:11:21+5:302020-06-12T22:14:10+5:30
धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात एक कुजलेला मृतदेह आढळला. मृताचा चेहरा ठेचल्यासारखा दिसून येत असल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वैद्यकीय अहवालाकडे नजर रोखली आहे.

नागपुरात पडक्या घरात मृतदेह आढळला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात एक कुजलेला मृतदेह आढळला. मृताचा चेहरा ठेचल्यासारखा दिसून येत असल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वैद्यकीय अहवालाकडे नजर रोखली आहे.
यशवंत स्टेडियम समोरच्या एचडीएफसी बँकेजवळ दीपक कुकरेजा यांच्या मालकीचे एक पडके घर (क्रमांक ३४) आहे. तेथून आज सकाळपासून तीव्र दुर्गंधी येत असल्याने बाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेथे मृतदेह पडून दिसला. त्यांनी वैद्यकीय पथकाला पाचारण केले मृतदेह ताब्यात घेऊन मेडिकलला पाठविण्यात आला. मृताचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असून त्याच्या शरीरावर पांढरा शर्ट आणि काळा पॅन्ट आहे. मृताची एकूणच अवस्था लक्षात घेऊन आणि कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आधी मृताची कोरोना टेस्ट करून घेण्यात आली. त्याचा अहवाल आल्यानंतर उद्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे.