शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांड : आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:49 PM

ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकाला अटक केली. परमजितसिंग ऊर्फ बिट्टू भाटिया असे नवीन आरोपीचे नाव आहे. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.

ठळक मुद्देआरोपींची पोलीस कोठडी वाढली : कुख्यात मंजित वाडे आणि साथीदार फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकाला अटक केली. परमजितसिंग ऊर्फ बिट्टू भाटिया असे नवीन आरोपीचे नाव आहे. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. दरम्यान, यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी, कुख्यात गुंड लिटिल सरदार ऊर्फ शैलेंद्रसिंग गुरुचरणसिंग लोहिया (वय ४३, रा. अशोकनगर), त्याचा बॉडीगार्ड सिटू ऊर्फ हरजितसिंग गुरुबचनसिंग गौर (वय २८, रा. बिनाकी मंगळवारी), बाबू ऊर्फ गुरुमितसिंग बचनसिंग खोकर (वय ५६, रा. अशोकनगर, पाचपावली) आणि हनी ऊर्फ मणिंदरसिंग हरजिंदरसिंग चंडोक (वय ४४, रा. नागसेन विद्यालयासमोर, जरीपटका) यांच्या पीसीआरची मुदत संपल्याने, शुक्रवारी पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा पुन्हा सोमवारपर्यंत पीसीआर वाढवून घेतला.गुरुवारी २५ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपी लिटिल सरदार, मंजित वाडे आणि साथीदारांनी बॉबी माकन यांचे अपहरण केले होते. त्यांना पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये बसविल्यानंतर आरोपींनी त्यांची कार बेवारस अवस्थेत त्यांच्या घरापासून काही अंतरावर सोडून दिली. ते रात्रभर आणि दुसºया दिवशीही घरी परत न आल्यामुळे तसेच त्यांचे मोबाईलही बंद असल्यामुळे २६ एप्रिलच्या दुपारी बॉबीच्या पत्नीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली होती. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात मिसिंगची नोंद घेतली. त्यांचा शोध घेतला जात असतानाच २८ एप्रिलला बॉबीचा मृतदेह कोंढाळीजवळ सापडला. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. जरीपटका पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. अपहरणकर्त्यांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना तब्बल सात दिवस लागले. ज्या इनोव्हातून बॉबीचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती, ती कार गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली. त्यानंतर कार चालविणारा हनी चंडोक याला गुरुवारी ३ मे रोजी मुंबईत अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी कुख्यात लिटिल सरदार त्याचा बॉडीगार्ड सिटू गौर, बाबू खोकर यांना शुक्रवारी ४ मे रोजी अटक केली होती. त्यांचा १० मेपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला होता.आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी आरोपींकडून बॉबीचे मोबाईल जप्त केले. आरोपींनी ते नाल्यात फेकून दिले होते. शुक्रवारी कोर्टात हजर करून पोलिसांनी त्यांचा पुन्हा पीसीआर वाढवून मागितला. फरार असलेल्या आरोपीला अटक करायची आहे, मृत बॉबीचे कडे, पगडी जप्त करायची आहे, असे कोर्टाला सांगून पोलिसांनी सोमवार, १३ मेपर्यंत पीसीआर वाढवून घेतला. दरम्यान, आरोपींना गुन्ह्यासाठी इनोव्हा पुरविणारा बिट्टू भाटिया यालाही गुरुवारी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील आणखी एक मुख्य आरोपी कुख्यात गुंड मंजित वाडे (वय ५५) त्याच्या काही साथीदारांसह फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो पंजाब, छत्तीसगड किंवा नांदेडमध्ये दडून बसल्याचा संशय आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितल्यानुसार मंजित वाडे यानेच बॉबीच्या गळ्यात पट्टा टाकून फास आवळून त्याची हत्या केली. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके शोधाशोध करीत आहेत.पुरावे नष्ट करण्याचा आरोपबिट्टू भाटिया याने अपहरण आणि हत्येसारख्या अतिगंभीर गुन्ह्यात वापरण्यासाठी आरोपींना इनोव्हा उपलब्ध करून दिली. सोबतच गुन्हा केल्यानंतर आरोपींनी त्याला कार परत आणून दिल्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्या कारचे सीट कव्हर जाळले. त्यामुळे भाटियाला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.सुपारी गिळली जाणार?बॉबीने चार ते पाच जणांची कोट्यवधींची मालमत्ता अडवून धरली होती. त्या प्रत्येकाकडून दोन ते अडीच कोटींची सुपारी (बॉबी गेल्यास मालमत्ता मूळ मालकांना मिळेल, असे आमिष दाखवत) घेऊन बॉबीचा काटा काढण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या सुपारीबाबत आरोपींकडून माहिती काढून घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे सुपारी गिळली जाण्याची भीती वर्तविली जात आहे. असे झाल्यास ज्यांनी सुपारी दिली, ते आरोपीसुद्धा या खळबळजनक प्रकरणापासून दूर राहतील.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटक