शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून रक्त तपासणी

By admin | Updated: December 28, 2015 03:16 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये भरती महिला रुग्णाच्या पतीला पैशांच्या अभावी रक्ताच्या तपासणीसाठी भटकंती करावी लागत आहे.

मेडिकल प्रशासनाचे दुर्लक्ष : गरीब रुग्णांसमोर आर्थिक प्रश्ननागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये भरती महिला रुग्णाच्या पतीला पैशांच्या अभावी रक्ताच्या तपासणीसाठी भटकंती करावी लागत आहे. डॉक्टर आणि कर्मचारी या महिला रुग्णाच्या गरीब पतीला त्याच्या पत्नीच्या रक्ताची थायरॉईड तपासणी मेडिकल चौकातील एका खासगी पॅथॉलॉजीतून करण्याबाबत दबाव टाकत आहेत. मेडिकलमध्ये कार्यरत सुरक्षा कर्मचारी त्यांना एका खासगी पॅथॉलॉजीचे कार्ड देऊन तेथून रक्ताची तपासणी करण्याचा सल्ला देत आहेत. छिंदवाड्यावरून आलेल्या या दाम्पत्याची समस्या पाहून अ‍ॅक्शन कमिटीचे सदस्य मेडिकलच्या लॅबमध्ये गेले असता त्यांना रक्ताची तपासणी करण्याची सुविधा लॅबमध्ये उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. परंतु त्यासाठी संबंधित वॉर्डच्या अटेंडंट किंवा कर्मचाऱ्याच्या माध्यमातून रक्ताच्या नमुन्याची बॉटल लॅबमध्ये न्यावी लागते. कमिटीचे सदस्य सचिन बिसेन, मुकेश वानखेडे महिलेच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये पोहोचले. त्यांनी वॉर्डच्या नर्सपासून रक्ताचे नमुने वॉर्ड कर्मचाऱ्याच्या माध्यमातून लॅबमध्ये पाठविण्याची विनंती केली. परंतु नर्सने डॉक्टरने सांगितल्यानंतरच कुठलेही काम करण्यात येत असल्याचे सांगून हात झटकले. या पद्धतीने आर्थिक परिस्थितीमुळे छिंदवाडावरून उपचारासाठी आलेल्या महिलेच्या रक्ताची तपासणी होऊ शकली नाही. पीडित दाम्पत्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याजवळ पैसे होते तेंव्हा त्यांनी बाहेरून महत्त्वाच्या तपासण्या केल्या. परंतु आता पैसे संपले आहेत. शुक्रवारी १८ डिसेंबरला व्यवसायाने टेलर असलेले प्रकाश नामदेव आपल्या गर्भवती पत्नीला शरीरावर सूज असल्यामुळे मेडिकलमध्ये घेऊन आले. ते डागा हॉस्पिटलला गेल्यानंतर तेथे त्यांच्या पत्नीची स्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. अ‍ॅक्शन कमिटीच्या सदस्यांनी त्यांची समस्या पाहून त्यांना मेडिकलमध्ये भरती केले. मेडिकलमध्ये महिलेचे अबॉर्शन झाले. या दरम्यान तपासणी आणि औषधांसाठी त्यांच्या जवळचे पैसे संपले. आता वॉर्ड क्रमांक ३४ च्या डॉक्टरांनी त्यांना सॅम्पल देऊन बाहेरून तपासणी करण्यास सांगितले आहे. याबाबत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)पतीही पडला आजारीपत्नीला उपचारासाठी आणल्यानंतर रुग्णालय परिसरात मुक्काम केलेला पती प्रकाशही थंडीमुळे आजारी पडला आहे. डॉक्टरांच्या मते त्याने भोजन न केल्यामुळे त्याच्या पोटात अ‍ॅसिडीटीची समस्या निर्माण झाली. थंडीमुळे त्याची तब्येत बिघडली. त्याच्या उपचारासाठी कमिटीच्या युवकांनी पैशांची मदत केली.