शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नाना पटोलेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याचा ठपका : राजकीय वर्तुळात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 8:28 PM

न्यायालयाच्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता स्वत:च्या व्टिटर अकाउंटवर दिशाभूल करणारा मजकुर अपलोड करण्याचा प्रकार नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोलेंविरुद्ध नायब तहसीलदार स्रेहल ढोके यांनी सदर पोलीस ठाण्यात आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. सोमवारी रात्री त्यांनी दिलेल्या तक्रारीची माहिती कळताच राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनायब तहसीलदारांची तक्रार : सदर पोलिसांकडून एनसी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाच्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता स्वत:च्या व्टिटर अकाउंटवर दिशाभूल करणारा मजकुर अपलोड करण्याचा प्रकार नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोलेंविरुद्ध नायब तहसीलदार स्रेहल ढोके यांनी सदर पोलीस ठाण्यात आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. सोमवारी रात्री त्यांनी दिलेल्या तक्रारीची माहिती कळताच राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.सरपंच भवनातील ईव्हीएम मशिनची एफएलसी तपासणी सुरू असल्यामुळे २५ ते २८ मार्च दरम्यान स्ट्राँग रूम मध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नव्हते. त्यामुळे पटोलेंनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट याचिका दाखल केली होती. या संबंधाने न्यायालयाने ६ एप्रिलला दिलेल्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता पटोलेंनी त्यांच्या व्टिटर अकाउंटवर ७ एप्रिलला ‘ ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमचे फुटेज पटोलेंना द्या, कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश, आम्ही नागपूरकरांसाठी लढा लढल्याशिवाय राहणार नाही. हे दाखवून दिले. निवडणूक खुली व निष्पक्ष झालीच पाहिजे, असे संदेश प्रसारित केले होते’. यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली होती. या संबंधाने एमसीएमसी कमिटीत चर्चा झाली आणि पटोलेंना खुलासाही मागण्यात आला होता. त्यांच्याकडून आलेला खुलासा लक्षात घेता त्यांनी निवडणूकीवर गैरवाजवी प्रभुत्व पाडल्याचे अर्थात  आचार संहितेचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षात नोडल अधिका-यांनी पटोलेंविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, नायब तहसीलदार स्रेहल ढोके यांनी सोमवारी सदर पोलीस ठाण्यात या संबंधाने तक्रार दिली. पोलिसांनी ती तक्रार स्विकारून कलम १७१ सी/ १७१, एफ प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जाते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Nana Patoleनाना पटोले