शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

कोबी-पालकामुळे शेळ्या-बकऱ्यांमध्ये वाढताहेत मूत्राशयाचे विकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 3:29 PM

तुम्ही तुमच्या पाळीव पशुंना पत्ताकोबी, पालक, सडलेले टोमॅटो आहार म्हणून देता का ? तसे करीत असाल तर तुम्ही तुमच्या पशुंचे आयुष्य कमी करीत आहात.

ठळक मुद्देपशूंना असतो थायरॉईडचा धोका

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुम्ही तुमच्या पाळीव पशुंना पत्ताकोबी, पालक, सडलेले टोमॅटो आहार म्हणून देता का ? तसे करीत असाल तर तुम्ही तुमच्या पशुंचे आयुष्य कमी करीतआहात. कारण या सर्व भाज्यात ‘आॅक्झालेट’चे प्रमाण अधिक असल्यामुळे पाळीव प्राण्यात सध्या मूत्राशयाशी संबंधित आजार अधिक वाढत असल्याचे तथ्य अभ्यासातून पुढे आले आहे. मूत्राशयाच्या या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास तुमचा पाळीव पशु दगवण्याची जास्त भीती आहे. ग्रामीण आणि शहरी पशुआहाराचे प्रमाण कमी झाल्याने भाजी मंडीतील पालक, स्वस्तातील कोबी आणि सडलेले टोमॅटो पशुंना आहारात देण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. या भाज्यामुळे पशुंचे वजन वाढत असल्याचा पशुपालकांचा समज असला तरी हा समज त्यांच्यासाठी धोक्याचा ठरतो आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासकांनी केलेल्या अध्ययनातून ही बाब पुढे आली आहे.या भाजीपाल्यातील ‘आॅक्झालेट’चा शरीरातील कॅलशियम सोबत संभोग झाल्याने पशुंना किडनी स्टोन (मूत्राशयाचा) आणि थायरॉईडचा आजार होतो. ग्रामीण भागात अशा पशुंचे प्रमाण कमी असले तरी नागपुरातील मोमीनपुरा परिसरातील पशुपालकांच्या बकऱ्या आणि बोकाडांना मूत्राशयाचा हा आजार अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. या आजारामुळे पशुंची लघुशंका बंद पडते. अशा पशुवर ७२ ते ९६ तासात उपचार न झाल्याने मूत्राशयातील त्यांचे ब्लडर फुटण्याची जास्त भीती असते. परिणामी यामुळे पशुचा मूत्यू होतो.

दोन प्रकारच्या शस्त्रक्रियापशुंना मूत्रशयाच्या होणाऱ्या या आजारावर दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. या पहिली मूत्राशय (सिसटॉटामी) तर दुसरी शस्त्रक्रिया मूत्रनलिकेची(युरेथ्रोटॉमी) केली जाते,असे पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक पशुचिकित्सालय संकुलाचे संचालक डॉ.एस.बी.आकरे आणि अधीक्षक डॉ.बी.एम.गहलोत यांनी सांगितले.

पाळीव कुत्र्यांना रेडिमेटड फूडचा फटकाबाजारात उपलब्ध असलेल्या रेडिमेड फूडमुळे पाळीव कुत्र्यांना मूत्राशयाचे आजार होत असल्याची माहिती पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी दिली. रेडिमेड फूडमध्ये ‘आॅक्झालेट’चे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :wildlifeवन्यजीव