शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

बाणाला भाजपची ताण

By admin | Updated: May 17, 2014 01:57 IST

काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या रामटेकच्या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकविण्यात शिवसेनेला यश आले. भाजपने पूर्ण ताकदीनिशी ताणून धरणेला ‘बाण’

काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या रामटेकच्या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकविण्यात शिवसेनेला यश आले. भाजपने पूर्ण ताकदीनिशी ताणून धरणेला ‘बाण’ शिवसेनेच्या धनुष्यातून असा सुसाट सुटला की केंद्रात मंत्री राहिलेले व राहुल ब्रिगेडच्या गोटात वावरणारे खा. मुकुल वासनिक यांना घायाळ करून सोडले. गेल्यावेळी थोड्या मतांनी हरलेले शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी यावेळी काँग्रेसचे वासनिक यांना तब्बल १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी पराभूत केले. बसपाच्या किरण पाटणकर या ९५ हजार ५१ मते घेत तिसर्‍या तर ‘आप’चे प्रताप गोस्वामी हे २५ हजार ८८९ मतांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिले. गेल्यावेळी तुमाने शिवसेनेत वेळेवर दाखल झाले होते. त्यामुळे पक्षांतर्गत दगाफटका झाला. या वेळी मात्र, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना ठणकावत कामाला लावले होते. नागपुरात गडकरी रिंगणात असल्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघातही भाजप कार्यकर्त्यामध्ये उत्साह होता. अतवृष्टी, डबघाईस आलेली जिल्हा बँक यामुळे शेतकर्‍यांचा काँग्रेसवर रोष होता.

की फॅक्टर काय ठरला?

मुकुल वासनिक मंत्री असताना दिल्लीतच रमले, मतदारसंघात फिरकले नाहीत, असा त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या प्रचार मतदारांच्या मनाला भिडला. गेली निवडणूक हरल्यानंतर तुमाने हे सतत मतदारसंघाच्या संपर्कात राहिले. याचेच त्यांनी भांडवल केले.

शिवसेनेसाठी भाजपने शक्ती पणाला लावली. त्यातुलनेत काँग्रेस कार्यकर्ते सक्रीय दिसले नाहीत. राष्ट्रवादीही फक्त सभा, बैठका घेण्यापुरतीच दिसत होती. निवडणूक यंत्रणा पाहिजे तशी राबली नाही. वासनिकांनी केलेल्या कामांच्या मार्केटिंगमध्ये काँग्रेस नेते कमी पडले.