राहुल गांधी-बॅनर्जींविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार, निषेध आंदोलन
By योगेश पांडे | Updated: December 21, 2023 19:44 IST2023-12-21T19:44:01+5:302023-12-21T19:44:21+5:30
उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात झालेल्या मिमिक्री प्रकरणावरून नागपुरात भाजपने आंदोलन केले.

राहुल गांधी-बॅनर्जींविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार, निषेध आंदोलन
नागपूर : उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात झालेल्या मिमिक्री प्रकरणावरून नागपुरात भाजपने आंदोलन केले. उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी व त्यांचा मोबाईलने व्हिडीओ काढणारे काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपतर्फे गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल करण्यात आली. यावरून राजकारण तापले आहे.
या प्रकरणाच्या भाजपच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. नागपुरात महाल येथील टिळक पुतळ्याजवळ आंदोलन झाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष बंटी कुकडे, आ.प्रवीण दटके, माजी आमदार मिलींद माने यांच्या नेतृत्वात घोषणा देण्यात आल्या. राहुल गांधी यांनी उपराष्ट्रपती यांचा अपमान केला, हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, अशा घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान यापुढे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजप नेत्यांनी बॅनर्जी व काँग्रेसला दिला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या वैशाली चोपडे, गुड्डू त्रिवेदी, संदीप गवई, भोजराज डुंबे, विष्णू चांगदे, राम आंबुलकर, भाजयुमो अध्यक्ष बादल राऊत, चंदन गोस्वामी, श्रीकांत आगलावे, सुबोध आचार्य, प्रमोद चिखले, गुड्डू पांडे इत्यादी उपस्थित होते.