भाजप नेत्यांच्या ‘ब्रेकफास्ट’चा फोटो ‘व्हायरल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:11 IST2018-04-13T00:11:31+5:302018-04-13T00:11:41+5:30

गुरुवारी भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवस होता व सकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी भाजप नेते एकत्र आले होते. उपोषण सुरू होण्याअगोदर तेथे काही भाजप नेत्यांनी ‘ब्रेकफास्ट’ घेतला. याचे फोटो ‘व्हायरल’ झाले आहेत.

BJP's 'breakfast' photo viral | भाजप नेत्यांच्या ‘ब्रेकफास्ट’चा फोटो ‘व्हायरल’

भाजप नेत्यांच्या ‘ब्रेकफास्ट’चा फोटो ‘व्हायरल’

ठळक मुद्देजयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी पोटपूजा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता यांचा वाढदिवस होता व सकाळच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी भाजप नेते एकत्र आले होते. उपोषण सुरू होण्याअगोदर तेथे काही भाजप नेत्यांनी ‘ब्रेकफास्ट’ घेतला. याचे फोटो ‘व्हायरल’ झाले आहेत. यात भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, भाजपच्या विस्तारक योजनेचे विदर्भ संयोजक देवेन दस्तुरे, नगरसेविका रुपा राय नाश्ता करताना दिसून येत आहेत. हा फोटो ‘व्हायरल’ झाल्यानंतर दिवसभर ‘सोशल मीडिया’सह शहरातील राजकीय वर्तुळात याचीच चर्चा होती. भाजप नेतेदेखील ‘पेटपूजा’ करुनच उपोषणाला गेले. हे सोयीचेच ‘उपोषण’ होते, अशी टीका विरोधकांनी केली. तर भाजपमधील सूत्रांनी गुप्ता यांच्याकडे नेत्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ल्याचे सांगितले. याबाबत सुधाकर कोहळे यांना संपर्क केला असता उपोषणाच्या वेळेत आम्ही काहीही खाल्ले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत नेत्यांनी खा.डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण केले. नेमका कुठला फोटो ‘व्हायरल’ झाला आहे, याची मला माहिती नाही. मात्र मंडपात नसलेल्या नेत्यांनीदेखील दिवसभर उपोषणाच्या संहितेचे पालन केले, असे ते म्हणाले.

 

Web Title: BJP's 'breakfast' photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.