शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

धार्मिक स्थळे उघडण्यासाठी नागपुरात भाजपचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 2:04 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद आहेत. भाजपाने ते उघडण्याच्या मागणीसाठी शनिवारी शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रात विविध धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन केले. दारूची दुकाने, मॉल सुरु होऊ शकतात तर मग मंदिर का नाही, असा प्रश्नही भाजप नेत्यांनी यावेळी सरकारला केला.

ठळक मुद्देप्रत्येक विधानसभा क्षेत्रात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद आहेत. भाजपाने ते उघडण्याच्या मागणीसाठी शनिवारी शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रात विविध धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन केले. दारूची दुकाने, मॉल सुरु होऊ शकतात तर मग मंदिर का नाही, असा प्रश्नही भाजप नेत्यांनी यावेळी सरकारला केला.शहरात भाजपाने वर्धा रोड येथील साई मंदिर व गुरुनानकपुरा कामठी रोडवरील गुरुद्वारासमोर आंदोलन केले. शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके आणि प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत घंटानाद करून नारेबाजी करण्यात आली. आंदोलनात संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, मुन्ना यादव, किशोर वानखेडे, विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संजय चौधरी, सुरेंद्र यादव, राजू बावरा, प्रभाकर येवले, गोल्डी तुली, हनी भंडारी, ओमप्रकाश इंगळे, साहेबराव इंगळे, प्रशांत आरगोडे, अजय बांते, आशिष नाईक, संजय डबली यांचा समावेश होता. त्याचप्रकारे कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरासमोरही आंदोलन करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात राज्य सरकार भक्तांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करण्यात आला.ताजाबाद व कामठी दरगाह समोरही आंदोलनभाजप अल्पसंख्यक मोर्चाने सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी करीत ताजाबाद दरगाह परिसर आणि कामठी येथील अब्दुल्लाह शाह बाब दरगाह परिसरात आंदोलन केले. या दरम्यान मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुैनद खान, असलम खान, रमजान अन्सारी, हाजी रहीम, शहनाज अली, फऐय्याज खान, राशिद काजी, इकराम अन्सारी, बाबा भाई, सैफुद्दीन शकील भाई, इलागी बख्श, बाबू भाई आदींचा समावेश होता.पूर्व नागपुरात प्रत्येक प्रभागात निदर्शनेपूर्व नागपुरात आ. कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात प्रत्येक प्रभागातील मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात उपमहापौर मनीषा कोठे, नगरसेवक बाल्या बोरकर, प्रदीप पोहाणे, राजकुमार सेलोकर, अभिरुची राजगिरे, बंटी कुकडे, धर्मपाल मेश्राम, मनोज चापले, हरीश डिकोंडवार, कांता रारोकर, सरिता कावरे, मनीषा धावडे, अनिल गेंडरे, दीपक वाडीभस्मे, वैशाली रोहणकर, वंदना भुरे आदी सहभागी होते.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनReligious Placesधार्मिक स्थळे