नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने शिस्त आणि पक्षनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देत पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ३२ सदस्यांवर कडक कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम करणे अथवा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणे, या कारणांवरून संबंधित सदस्यांचे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये विविध प्रभागांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रभाग १ ते ३४ पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रभागांतील एकूण ३२ जणांवर ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये सुनिता महल्ले, देवराज वासनिक, नसिमाबानो, सचिन खोब्रागडे, सुरेश टेंभरे, महेंद्र गुप्ता, पुष्पा किरपाने, रुणाल चौहान, सुनील अग्रवाल, विनायक डेहनकर, धीरज चव्हाण, अक्षय ठवकर, प्रकाश घाटे, पापा यादव, विशाल लारोकर, शुभम मौदेकर, सुलोचना कोवे, राकेश भनारकर, रविशंकर कुंभारे, दशरथ मस्के, आशिष भुते, नंदिनी भुते, टेकचंद सोनबोईर, नंदु अहिर, रेणु गेंडरे, शुभम पडोळे, राजू घोसे, सुनील मानापुरे, सोनाली घोडमारे, दिपक चौधरी, आसावरी कोठीवान आणि सुनील मानेकर यांचा समावेश आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले की, “भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाचा आदेश अंतिम असतो. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही.”
निलंबनानंतर संबंधित व्यक्तींचा पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रम, पद किंवा मोहिमेशी कोणताही संबंध राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी एकसंघपणे काम करावे, असे आवाहनही पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
Web Summary : Ahead of elections, BJP Nagpur suspended 32 members for six years for anti-party activities, including contesting against official candidates. The party emphasized discipline and warned against disobedience.
Web Summary : चुनाव से पहले, बीजेपी नागपुर ने पार्टी विरोधी गतिविधियों, जिसमें आधिकारिक उम्मीदवारों के खिलाफ चुनाव लड़ना शामिल है, के लिए 32 सदस्यों को छह साल के लिए निलंबित कर दिया। पार्टी ने अनुशासन पर जोर दिया और अवज्ञा के खिलाफ चेतावनी दी।