ओबीसी आरक्षणावरून नागपुरात भाजप-काँग्रेस आमने-सामने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 00:36 IST2021-06-27T00:35:09+5:302021-06-27T00:36:39+5:30

BJP-Congress agitationओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या विरोधातील आंदोलनाच्या माध्यमातून भाजप-काँग्रेस आमने-सामने आल्याचे चित्र शनिवारी नागपुरात बघायला मिळाले.

BJP-Congress front infront in Nagpur over OBC reservation | ओबीसी आरक्षणावरून नागपुरात भाजप-काँग्रेस आमने-सामने 

ओबीसी आरक्षणावरून नागपुरात भाजप-काँग्रेस आमने-सामने 

ठळक मुद्देभाजपचा चक्काजाम : काँग्रेसची ब्लॉक स्तरावर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या विरोधातील आंदोलनाच्या माध्यमातून भाजप-काँग्रेस आमने-सामने आल्याचे चित्र शनिवारी नागपुरात बघायला मिळाले. भाजपने व्हेरायटी चौकात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. तर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात शहरातील १८ ब्लाॅकमध्ये निदर्शने करण्यात आली. आरक्षण रद्द होण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांवर खापर फोडले.

भाजपने पक्षातील ओबीसी नेत्यांना पुढे करीत या आंदोलनासाठी जोरात तयारी केली होती. पक्षातील जवळपास सर्वच ओबीसी चेहरे आंदोलनात सहभागी झाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नेतृत्त्व केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह होता. यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर दयाशंकर तिवारी, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मनपातील सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. आंदोलनात माजी आमदार सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, विकास कुंभारे, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ मिलिंद माने, अशोक मेंढे, धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर,नंदा जिचकार,बाल्या बोरकर,रमेश चोपडे, प्रकाश भोयर, गोपाल बोहरे, कामिल आंसारी, नाना उमाटे, भोजराज डुम्बे, अश्विनी जिचकार, मुन्ना यादव, दिव्या धुरडे, परिणिता फुके, घनश्याम चौधरी, सुधाकर बैतुले, संजय चौधरी, संजय अवचट, प्रमोद पेंडके, संजय बंगाले, राम आम्बुलकर, सुनील मित्रा, किशोर वानखेडे, विनोद कन्हेरे, किशोर पलांदुरकर, देवेन दस्तूरे, नीता ठाकरे, राजेश हातिबेड आदी सहभागी झाले.

भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेसही मैदानात उतरली. आरक्षणाचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून काँग्रेसने शहरात १८ ठिकाणी आंदोलन केले. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आ. विकास ठाकरे यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला.

प्रताप नगर चौकात ओबीसी विभागाचे अध्यक्ष पंकज निघोट, ब्लॉक अध्यक्ष पंकज थोरात, रजत देशमुख, राकेश पन्नासे, वृंदा ठाकरे, आकाश तायवाडे, प्रशांत कापसे, कुमार बोरकुटे, पश्चिम नागपुरातील अवस्थी नगर चौकात ब्लॉक अध्यक्ष प्रमोद ठाकूर, राम कळंबे, बापु बरडे, सुभाष मानमोडे, संजय भिलकर, राजेश पायतोडे, बंडू ठाकरे, जगदीश गमे, अविनाश पाटील, आशाताई शेंद्रे, रजनीताई शेंडे आदींनी आंदोलन केले. दक्षिण नागपुरात गिरीष पांडव, डॉ.गजराज हटेवार यांच्या नेतृत्वात, मानेवाडा चौकात ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराळे, सुनील पाटील, प्रफुल भाजे, किशोर गीद, नगरसेवक मनोज गावडे, मध्य नागपुरात सेवासदन चौक, सी.पी. ॲण्ड बेरार कॉलेज जवळ ब्लॉक अध्यक्ष अब्दुल शकील, गोपाल पट्टम, नगरसेवक जुल्फीकार भुट्टो, वसीम खान, निजाम अंसारी, मोतीराम मोहाडीकर, महेश श्रीवास, व्यापारी सेल चे अध्यक्ष श्रीकांत ढोलके, पूर्व नागपुरात ॲड. अभिजीत वंजारी यांच्या नेतृत्वात आंबेडकर चौक येथे ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, राजेश पवनीकर, युवराज वैद्य, ईरशाद अली, उत्तर नागपुरातील इंदोरा चौकात ब्लॉक अध्यक्ष ईरशाद मलीक, सुनीता ढोले, बॉबी दहीवले,धरम पाटील आदींनी आंदोलन केले.

-----------------

भाजप म्हणते

- संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण कायम असताना केवळ महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचे आरक्षण रद्द झालेले आहे.

- आरक्षण पूर्ववत होत नाही, तोवर हा संघर्ष असाच रस्त्यावर दिसत राहील.

काँग्रेस म्हणते

- ओबीसी आरक्षण रद्द होण्याला केंद्र सरकारच जबाबदार.

- या आरक्षणासाठी आवश्यक असलेली आकडेवारी सर्वोच्च न्यायालयाने मागितली असता केंद्र सरकारने दिली नाही.

Web Title: BJP-Congress front infront in Nagpur over OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.