कॉंग्रेसच्या खासदार धीरज साहूंविरोधात भाजप आक्रमक, पुतळा जाळून निषेध

By योगेश पांडे | Updated: December 11, 2023 11:44 IST2023-12-11T11:44:15+5:302023-12-11T11:44:54+5:30

साहू यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त झाला आहे.

BJP aggressive against Congress MP Dheeraj Sahu, protests by burning effigy | कॉंग्रेसच्या खासदार धीरज साहूंविरोधात भाजप आक्रमक, पुतळा जाळून निषेध

कॉंग्रेसच्या खासदार धीरज साहूंविरोधात भाजप आक्रमक, पुतळा जाळून निषेध

नागपूर : कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने तीनशे कोटींहून अधिकची रोकड जप्त केली आहे. याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून साहू यांच्यासोबत कॉंग्रेस नेत्यांविरोधात नागपुरात सहाही मंडळांमध्ये आंदोलन करण्यात आले. सतरंजीपुरा चौकात तर आ.कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात साहू यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

साहू यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त झाला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे ‘मोहब्बत की दुकान’ असल्याचे म्हणतात. प्रत्यक्षात कॉंग्रेस पक्ष हा ‘भ्रष्ट मोहब्बत की दुकान’ असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी लावला. सतरंजीपुरा चौकासोबतच पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील गिट्टीखदान चौक, दक्षिण नागपुरातील तुकडोजी पुतळा चौक, उत्तर नागपुरात कमाल चौक, मध्य नागपुरात महालातील टिळक पुतळा, दक्षिण-पश्चिम नागपुरात प्रतापनगर चौकात आंदोलन करण्यात आले. सक्करदरा चौकात शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. सर्व आंदोलनांमध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

Web Title: BJP aggressive against Congress MP Dheeraj Sahu, protests by burning effigy