शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जन्मठेप सहा वर्षांत परिवर्तित

By admin | Updated: October 11, 2014 02:54 IST

सर्व्हिस रायफलीतून गोळी झाडून मित्राची हत्या करणाऱ्या एका आरपीएफ जवानाची आजन्म कारावासाची शिक्षा उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि ...

नागपूर : सर्व्हिस रायफलीतून गोळी झाडून मित्राची हत्या करणाऱ्या एका आरपीएफ जवानाची आजन्म कारावासाची शिक्षा उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. व्ही. एन. देशपांडे यांच्या खंडपीठाने सहा वर्षांच्या कारावासात परिवर्तित केली. मनोज सिसोदिया, असे आरोपीचे नाव आहे. मलखानसिंग बघेल, असे मृताचे नाव होते. या प्रकरणाची हकीकत अशी, हत्येची ही घटना २० मे २०१० रोजी पाचपावली पोलीस ठाण्याच्या मेकोसाबाग भागात घडली होती. मनोज आणि मलखानसिंग हे दोघेही आरपीएफचे जवान होते. मेकोसाबाग येथे रक्षक म्हणून ते तैनात असायचे. घटनेच्या दोन-तीन महिन्यापूर्वी मनोजचा विवाह झाला होता. मलखानसिंग आणि मनोज मित्र होते. त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे होते. मलखानसिंगची नजर मात्र मनोजच्या पत्नीवर होती. घटनेच्या दिवशी मनोज हा आपल्या कर्तव्यावर तैनात असताना मलखानसिंग याने त्याची मोटरसायकल मागितली होती. मोटरसायकल घेऊन गेल्यानंतर तो कोठे तरी दारू प्याला होता. त्यानंतर तो नशेत मनोजच्या घरी गेला होता. त्याने मनोजच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला होता आणि घडलेली घटना फोनवर आपल्या पतीला सांगितली होती. परिणामी मनोज संतप्त झाला होता. तो घराकडे जात असतानाच मलखानसिंग त्याला रस्त्यातच भेटला होता. रागाच्या भरात मनोजने रायफलीतून एक गोळी मलखानसिंगच्या छातीवर झाडली होती. त्यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने मनोजला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अपील दाखल करून मनोजने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आरोपीने हे कृत्य रागाच्या भरात आणि भावनेच्या आहारी जाऊन केले. मित्राने केलेला विश्वासघात त्याला सहन झाला नाही. त्याने एकच गोळी मारली होती. न्यायालयाने या गोष्टी विचारात घेऊन आरोपी मनोजची जन्मठेप सहा वर्षांच्या शिक्षेत परिवर्तित केली. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. अनिरुद्ध जलतारे तर सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील ठाकरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)