शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

पक्ष्याची विमानाला धडक; वैमानिकाच्या तत्परतेमुळे २७२ प्रवाशांचा जीव वाचला

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 2, 2025 17:44 IST

इंडिगोचे नागपूर-कोलकाता विमान : ५० प्रवासी नागपूर-दिल्ली विमानाने रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसंगावधान दाखवणाऱ्या वैमानिकामुळे मंगळवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला. नागपूरहून कोलकात्याकडे रवाना झालेल्या इंडिगोच्या ६ए८१२ विमानाला उड्डाणानंतर लगेचच एका मोठ्या पक्ष्याची धडक बसली. यामुळे विमानाचा पुढील भाग नुकसानग्रस्त झाला.

घटना लक्षात येताच वैमानिकाने तत्काळ हवाई नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि परवानगी घेऊन विमान परत नागपूर विमानतळावर सुरक्षितरीत्या उतरवले. या विमानात २७२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्वजण सुखरूप असून कोणालाही इजा झालेली नाही.प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.१० वाजता इंडिगो एअरलाइन्सचे विमान नागपूरहून कोलकात्याकडे निघाले होते. मात्र पक्षाची धडक बसल्यानंतर तातडीने आकस्मिक लँडिंग करण्यात आले. नंतर अर्ध्याहून अधिक प्रवाशांनी तिकिट रद्द केले, तर ५२ प्रवाशांना इंडिगोच्या सकाळी ९.१५ च्या नागपूर- दिल्ली-भुवनेश्वर-कोलकाता विमानाने रवाना करण्यात आले.

विमानतळाच्या परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पक्ष्यांच्या धडकीची ही घटना एअरलाइन्ससाठी गंभीर मानली जात असून नागपूर विमानतळ व नागरी विमान वाहतूक विभागाने चौकशी सुरू केली आहे. नेमकी परिस्थिती कशी निर्माण झाली याचा तपास सुरू असून या घटनेनंतर विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

विमानातील प्रवासी माजी आ. सुधाकर कोहळे म्हणाले, विमान सकाळी ७.१० वाजता आकाशात झेपावले. थोड्याच वेळात विमान पुन्हा नागपूर विमानतळावर उतरत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. विमान सकाळी ७.४५ वाजता धावपट्टीवर सुखरूप उतरले. सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पक्षी धडकलेला विमानाचा समोरील भाग नुकसानग्रस्त झाल्याचे दिसले. विमानात क्रू सदस्यांसह २७२ जण प्रवासी होते. यामध्ये गोपाल चांडक, शेखर भोयर, नितीन कुंभलकर, खेळाडूंची २५ जणांची टीम आणि अन्यचा समावेश होता.

टॅग्स :nagpurनागपूरairplaneविमानAirportविमानतळ