शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

समता बँक संचालकांना दणका

By admin | Updated: January 15, 2015 01:01 IST

तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी समता सहकारी बँकेच्या सर्व संचालकांना घोटाळ्याच्या प्रकरणात निर्दोष ठरविले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी या वादग्रस्त

हायकोर्ट : प्रकरणाच्या निर्णयापर्यंत मालमत्ता विकण्यास मनाई
नागपूर : तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी समता सहकारी बँकेच्या सर्व संचालकांना घोटाळ्याच्या प्रकरणात निर्दोष ठरविले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी या वादग्रस्त आदेशावर अंतरिम स्थगिती देऊन सर्व संचालकांना दणका दिला आहे. तसेच, प्रकरणाच्या निर्णयापर्यंत सर्वांना मालमत्ता विकण्यास मनाई केली आहे.
सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक बी. डी. झलके यांनी बँकेच्या सर्व संचालकांसह एकूण १८ जणांना घोटाळ्यासाठी दोषी ठरवून १३६ कोटी २५ लाख रुपयांची जबाबदारी निश्चित केली होती. तसेच, ३१ डिसेंबर २०१० रोजी सर्वांची मालमत्ता जप्त केली होती. याविरुद्ध सर्व संचालकांनी सहकारमंत्र्यांकडे अपील केले होते. सहकारमंत्र्यांनी २०११ मध्ये मालमत्ता विक्रीवर स्थगिती दिली. यानंतर हे प्रकरण ३ वर्षे प्रलंबित राहिले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधी सहकारमंत्र्यांनी संचालकांचे अपील स्वीकारून त्यांना निर्दोष ठरविले. याविरुद्ध समता सहकारी बँक ठेवीदार कृती समितीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. यावर उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश देतानाच सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अमित खरे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
कोण आहेत संचालक
समता सहकारी बँकेच्या संचालकांमध्ये सुभाष पिंजरकर, अरविंद बोंद्रे, नागवरम श्रीनिवास, अरुणा देसाई, नवमनी तिरपुडे, सुनील बाळबुधे, अशोक नारखेडे, प्रभाकर समर्थ, प्रकाश भिसीकर, हेमलता गजघाटे, माला सनकाळे, रेखा सनकाळे, गजानन सेलूकर व मिलिंद चिमूरकर यांचा समावेश आहे. या सर्वांसह राज्य शासनाचे मुख्य सचिव, सहकार विभागाचे सचिव, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार आयुक्त, समता बँक अवसायक व रिझर्व्ह बँक यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.