मिलिट्रीच्या वाहनाने बाइकस्वाराला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 23:25 IST2021-06-30T23:24:16+5:302021-06-30T23:25:13+5:30
biker crushed by a military vehicle पाचपावलीच्या मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ मिलिट्रीच्या वाहनाने चिरडल्यामुळे एका बाइकस्वाराचा मृत्यू झाला.

मिलिट्रीच्या वाहनाने बाइकस्वाराला चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावलीच्या मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ मिलिट्रीच्या वाहनाने चिरडल्यामुळे एका बाइकस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. सिराजुद्दीन शमशुद्दीन (४८, रा. पेन्शननगर) असे मृतकाचे नाव आहे.
व्यापारी सिराजुद्दीन सोमवारी दुपारी २.१५ वाजता बाइकने इतवारीला घरी जात होते. मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ मिलिट्रीचे मेडिकल वाहन क्रमांक ११ सी/०८९१७९/पीने सिराजुद्दीनच्या बाइकला धडक दिली. यात सिराजुद्दीन गंभीर जखमी झाले. हे पाहून वाहनचालक पळून गेला. सिराजुद्दीनला त्वरित मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मशीन बंद असल्याचे सांगून त्यांना मेडिकलला नेण्यास सांगितले. रुग्णवाहिका नसल्यामुळे तेथेच काही वेळ गेला. रुग्णवाहिका मिळाल्यानंतर कुटुंबीय सिराजुद्दीनला घेऊन मेडिकलसाठी रवाना झाले असता बराच वेळ वाहतुकीत अडकले. मेडिकलला पोहोचण्यासाठी बराच वेळ लागत असल्यामुळे कुटुंबीय पुन्हा सिराजुद्दीनला घेऊन मेयोत परतले. परंतु उपचार मिळण्यास तीन तासापेक्षा अधिक वेळ लागल्यामुळे सिराजुद्दीनचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनुसार त्वरित उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. जखमी होऊन तीन तास लोटूनही सिराजुद्दीनवर उपचार सुरू करण्यात आले नाही. मेयोचे डॉक्टर उपकरण बंद असल्याचे सांगून टाळाटाळ करीत होते. मेयोतून मेडिकलला नेण्यासाठी रुग्णवाहिका असूनही देण्यात आली नाही. पाचपावली पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.