भरधाव बाईकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

By दयानंद पाईकराव | Updated: May 5, 2024 00:15 IST2024-05-05T00:14:50+5:302024-05-05T00:15:16+5:30

नागपूर : भरधाव वेगात असलेल्या बाईक चालकाने धडक दिल्यामुळे दुचाकीवर असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या ...

Bike rider dies in collision with speeding bike | भरधाव बाईकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

भरधाव बाईकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

नागपूर : भरधाव वेगात असलेल्या बाईक चालकाने धडक दिल्यामुळे दुचाकीवर असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. ही धडक एवढ्या जोरात झाली की मृतक दुचाकी चालकाच्या वाहनाचे मागील चाक तुटून वेगळे झाले.

वसंत भुरसे (५६, रा. महाल) असे या अपघातातमृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर रितेश गांजापुरे (२१) असे आरोपी बाईकस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत भुरसे हे आपल्या दुचाकीने अभ्यंकरनगरकडून बजाजनगरकडे येत होते. डिव्हायडरजवळ ते वाहन वळवत असताना अभ्यंकरनगरकडून बजाजनगरकडे भरधाव वेगाने येत असलेल्या रितेशने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

यात वसंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर बाईकस्वार रितेशही जखमी झाला. दोघांना बजाजनगर येथील सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी वसंत भुरसे यांना तपासून मृत घोषित केले. जखमी आरोपी बाईकस्वार रितेशवर उपचार सुरु आहेत. बजाजनगरच्या महिला पोलिस उपनिरीक्षक बाबर यांनी आरोपी बाईक चालक रितेशविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
 

Web Title: Bike rider dies in collision with speeding bike